अखेर मका खरेदी केंद्र सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी मोरगाव : रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली. पीक निघाले. मात्र आधारभूत हमीभाव मका ...

Maize Shopping Center will finally open! | अखेर मका खरेदी केंद्र सुरू होणार!

अखेर मका खरेदी केंद्र सुरू होणार!

ठळक मुद्देमका उत्पादकांना दिलासा : पाचशे हेक्टरवर लागवड, १० हजारावर शेतकऱ्यांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली. पीक निघाले. मात्र आधारभूत हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती. लोकमतने सुध्दा हा मुद्दा लावून धरला होता. आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नाने मका खरेदी केंद्र सुरू होणार आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी नगदी पिकाकडे वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जायचा. मात्र धान उत्पादक शेतकरी सहसा पीक पद्धतीत बदल करण्याच्या मानसिकतेत नसतो. तरी सुद्धा अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रात मका पीक लागवड करण्यात आली. पीक निघाले. मात्र आधारभूत हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाले नाही. व्यापारी वाटेल त्या भावाने मका खरेदी करायचे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. अनेक शेतकऱ्यांनी आ. चंद्रिकापुरे यांचेकडे धाव घेतली. त्यांनी आपले कर्तव्य पार पाडत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचेशी यासंदर्भात चर्चा केली. ना. भुजबळ यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांचेकडून परवानगी मिळाल्याने खरेदी केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील आदेश गुरुवारी (दि.७) निर्गमित होणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुपे यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितल्याची माहिती आ.चंद्रिकापुरे यांनी दिली. १७६० रुपये प्रती क्विंटल मक्याला हमीभाव असल्याची माहिती आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, किशोर तरोणे, अर्जुनी मोरगावचे नगराध्यक्ष किशोर शहारे, रतीराम राणे, पं.स. सदस्य सुशीला हलमारे, उद्धव मेहंदळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे, योगराज हलमारे, सोमा नरवास यांनी भूमिका मांडली होती.

Web Title: Maize Shopping Center will finally open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार