शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; चारही मतदारसंघात वाढतोय इलेक्शन ‘फिव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार जोरकस प्रचाराला लागले आहेत. उमेदवारी न मिळालेले अनेकजण समर्थक उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. यामुळे चारही मतदारसंघांत निवडणूक ज्वर तापला आहे. विजयादशमीनंतर खऱ्या अर्थाने राजकारणाचे रण पेटले.

ठळक मुद्देसंडे अँकर ।उमेदवारांच्या मागे मोठा फौजफाटा, लक्ष केंद्रीत करण्यासाठी नवीन फंडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात ९ सप्टेंबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रचाराला वेग आला आहे. प्रचारासाठी आता मोजके सात दिवस शिल्लक असल्याने पदयात्रा,रोड शो, कार्नर सभांच्या माध्यमातून उमेदवार अधिकाधिक उमेदवारांमपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे चारही मतदारसंघात इलेक्शन फिव्हर वाढत असल्याचे चित्र आहे.प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार जोरकस प्रचाराला लागले आहेत. उमेदवारी न मिळालेले अनेकजण समर्थक उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. यामुळे चारही मतदारसंघांत निवडणूक ज्वर तापला आहे. विजयादशमीनंतर खऱ्या अर्थाने राजकारणाचे रण पेटले.परस्परांवर टीका,आक्षेप नोंदविले जात आहेत. कुणी विकास कामांचा पाढा वाचत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर पाटी कोरी असलेले उमेदवार आश्वासनांची खैरात वाटत आहेत. यंदा आमदारकी मिळवायचीच, या इच्छेने पेटलेल्या उमेदवारांनी सर्वस्व पणाला लावले आहे.सोशल मीडियावर कार्यकर्ते सक्रीयविधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे कार्यकर्ते सोशल मीडियावरही प्रचार पत्रकाबरोबर प्रचारातील अपडेट फोटो व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक अशा माध्यमांवर टाकून एकाच वेळी अनेक मतदारांपर्यत पोहचिवण्याची व्यवस्था करीत आहेत, हायटेक प्रचार यंत्रणेवर उमेदवारांसह कार्यकर्तेही पसंती देत आहेत.मतदार यांद्यावर लक्षमतदारसंघात येणाºया गावांची नावे नक्की केल्यानंतर मतदार यादीची पडताळणी व त्यानंतर कुणाची नावे आहेत, कुणाची नाहीत, याचा शोध उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात जबाबदार पदाधिकारी घेत आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले जात आहे. विशेष म्हणजे, एकगठ्ठा मते विविध प्रकारच्या माध्यमातून आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न चालविले आहेत. याकिरता निकटवर्तीयांचीही मदत उमेदवारांकडून घेतली जात असल्याचे चित्र विविध मतदारसंघामध्ये दिसत येत आहे.अनेकांचा प्रचारात सहभागविधानसभा निवडणूक जसजसी जवळ येत आहे, तसतसे पक्षांचे कार्यकर्ते,पदाधिकारी उमेदवारांचे विविध घटकही प्रचारात सहभागी होत आहेत. यामध्ये महिला मंडळ, बचत गट, युवक मंडळ, किरकोळ व्यावसायीक व अन्य मंडळी आपापल्या उमेदवारांना पाठींबा देऊन प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. यामुळे प्रचार कार्यालयातही गर्दी वाढत असल्याचे चित्र मतदारसंघामध्ये दिसून येत आहे.कुटुंबीयांची प्रचारात उडीप्रचार कार्यात उमेदवारांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीय, विविध संस्थांचा कर्मचारी वर्गही सक्रि य झाला आहे. मतदार याद्यांची गावनिहाय जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली आहे. घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष भेट व प्रचारावर प्रत्येकाचा भर आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया