शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

Maharashtra Election 2019 ; नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जगात देशाची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 6:00 AM

गोपालदास अग्रवाल यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासात्मक कामे करुन या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या मुद्दावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे. आता त्यांच्या नेतृत्त्वात गोंदिया विधानसभा क्षेत्राचा अधिक गतीने विकास होणार असल्याचे अशोक इंगळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल। शक्ती प्रदर्शनासह दाखल केले नामांकन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कार्य आणि ध्येय धोरणातून संपूर्ण जगात भारताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रामाणिक नेतृत्त्व आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील पाच वर्षांपासून राज्यात शासन चालवित आहेत. अंत्यत पारदर्शक कारभार असणाऱ्या अशा नेतृत्त्वाच्या पाठीशी सर्व जनतेनी पुन्हा एकदा उभे राहावे असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी केले.गोंदिया विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शुक्रवारी युतीचे उमेदवार म्हणून नामाकंन दाखल केले. त्यापूर्वी सर्कस मैदानावर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ.खोमेश रहांगडाले, भाजप महिला जिल्हाध्यक्ष भावना कदम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी. जि.प.सदस्य नेतराम कटरे, माजी आ.रमेश कुथे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पकंज रहांगडाले, भाजप शहरध्यक्ष सुनील केलनका, गोंदिया ग्रामीण तालुकाध्यक्ष छत्रपाल तुरकर, जि.प. अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, माधुरी हरिणखेडे, रमेश अंबुले, घनश्याम पानतवने, शकील मन्सुरी, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले मागील पाच वर्षांत गोंदिया विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे झाली आहे. महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर झाली असल्याचे सांगितले. हेमंत पटले म्हणाले, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षाची शिस्त भंग करणाऱ्या पक्षात कुठलेच स्थान नाही. गोपालदास अग्रवाल यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासात्मक कामे करुन या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे सांगितले. गोपालदास अग्रवाल यांनी विकासाच्या मुद्दावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे. आता त्यांच्या नेतृत्त्वात गोंदिया विधानसभा क्षेत्राचा अधिक गतीने विकास होणार असल्याचे अशोक इंगळे यांनी सांगितले.या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन भाजप जिल्हा उपाध्यक्ष दीपक कदम, अपूर्व अग्रवाल यांनी केले. सभेनंतर सकर्स मैदान येथून भव्य रॅली काढण्यात आली. यात भाजपचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर ही रॅली उपविभागीय कार्यालया जवळ पोहचली. यानंतर भाजप सेना युतीचे उमेदवार म्हणून गोपालदास अग्रवाल यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

टॅग्स :gondiya-acगोंडियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल