शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; उमेदवारांच्या अकाऊंटवर भलत्यांचेच ‘एफिडेव्हीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तसेच अर्ज टाकून काही कारणांनी मागे घेणाऱ्या किंवा नाकारण्यात आलेल्यांचेही खाते येथे पाहवयास मिळते. मात्र या संकेत स्थळावर काही उमेदवारांच्या खात्यात त्यांच्याऐवजी भलत्यांचेच शपथपत्र जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात रिंगणात असलेल्या तीन उमेदवारांबाबत हा प्रकार घडल्याचे आढळले.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील प्रताप। जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची वैयक्तीक माहिती जाणून घेण्यासाठी निवडणूक आयोगाची एक विशिष्ट संकेत स्थळ आहे. त्यावर उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र (एफिडेव्हीट) पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र जिल्ह्यातील तीन उमेदवारांच्या खात्यावर भलत्यांचेच एफिडेव्हीट जोडण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. परिणामी या उमेदवारांची संपूर्ण माहितीच चुकीची दाखविली आहे.देशात लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली जाते. यात जनतेला आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याचा अधिकार आहे. यासाठी संबंधितांची संपूर्ण माहिती जाणून घेण्याची गरज असते. अशात निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर कुणीही त्यांच्या क्षेत्रात निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतो. उमेदवाराने त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेले शपथपत्र निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील त्यांच्या खात्यात पाहण्यासाठी उपलब्ध केले जाते. त्यानुसार, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तसेच अर्ज टाकून काही कारणांनी मागे घेणाऱ्या किंवा नाकारण्यात आलेल्यांचेही खाते येथे पाहवयास मिळते. मात्र या संकेत स्थळावर काही उमेदवारांच्या खात्यात त्यांच्याऐवजी भलत्यांचेच शपथपत्र जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात रिंगणात असलेल्या तीन उमेदवारांबाबत हा प्रकार घडल्याचे आढळले. यात, गोंदिया विधानसभा मतदारसंघातून रिंगणात असलेले चनिराम मेश्राम यांच्या खात्यात त्यांच्याऐवजी मारोतराव हुके पाटील (भोकर) यांचे शपथपत्र दिसत आहे. लक्ष्मण मेश्राम यांच्या खात्यात संजय गेंदलाल डोके (मध्य नागपूर) यांचे शपथपत्र दिसत आहे. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून शिवदास श्रावण साखरे यांच्या खात्यात बळवंत बसवंत वानखडे (दर्यापूर) यांचे शपथपत्र दिसत आहे. आता प्रकार घडल्याने जनतेला या उमेदवारांबाबतची माहिती जाणून घेणे शक्य नाही. कारण, या उमेदवारांचे शपथपत्रच नसल्याने त्यांची संपूर्ण माहितीच दडपल्या गेली आहे.ही चूक कुणाची हे जाणून घेण्यात तथ्य नाही. मात्र निवडणूक यंत्रणेच्या कारभारात एवढी मोठी चूक अपेक्षित नाही.रिंगणाबाहेरील उमेदवारांनाही फटकाविशेष म्हणजे, हा प्रकार फक्त रिंगणात असलेल्या उमेदवारांसोबतच घडला असे नाही.तर रिंगणाबाहेर असलेल्या काही उमेदवारांसोबतही घडला आहे. जिल्ह्यातच चार-पाच जणांसोबत हा प्रकार घडला असताना अवघ्या राज्यात किती उमेदवारांच्या खात्यात अशी चूक झाली आहे हे सांगणे कठीण आहे. यामुळे मात्र निवडणूक यंत्रणेतील गोंधळही चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया