मोबाईलवरून ‘भाग्यशाली’ ग्राहकांची फसवणूक

By Admin | Updated: January 24, 2015 22:58 IST2015-01-24T22:58:12+5:302015-01-24T22:58:12+5:30

‘बेटा मै बोल रही हुँ, शिमला के आश्रम से, अंकशास्त्र के नुसार हमारे आश्रम नें आपका मोबाईल नंबर चुना है. आप बहुत भाग्यशाली हो. जिन्हे हमारे आश्रम से मिलनेवाला है भाग्योदयी यंत्र.

The 'lucky' customer cheats from mobile phones | मोबाईलवरून ‘भाग्यशाली’ ग्राहकांची फसवणूक

मोबाईलवरून ‘भाग्यशाली’ ग्राहकांची फसवणूक

गोंदिया : ‘बेटा मै बोल रही हुँ, शिमला के आश्रम से, अंकशास्त्र के नुसार हमारे आश्रम नें आपका मोबाईल नंबर चुना है. आप बहुत भाग्यशाली हो. जिन्हे हमारे आश्रम से मिलनेवाला है भाग्योदयी यंत्र. इसके लिए आपको सिर्फ दो हजार ९०० रु पये देने होंगे’, असे कॉल तुमच्या मोबाईलवर आलेत तर सावध रहा. नागरिकांना ‘ईमोशनल ब्लॅकमेल’ करून ठगण्याचे प्रकार वाढले आहेत. टेलिमार्केटिंगचा गैरवापर करून ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार गोंदिया जिल्ह्यात समोर आले आहे.
सध्या मोबाईलवर असे अनेक प्रकारचे मॅसेज आणि कॉल येत आहेत. ईश्वर आणि धार्मिक भावनेचा गैरफायदा घेऊन विविध यंत्र विकण्याचा सपाटा सुरू आहे. एवढेच नाही तर दूरचित्रवाहिन्यांवरूनसुद्धा ग्राहकांना भुरळ घातली जात आहे. प्रसिद्ध व्यक्तीच्या वलयाचा फायदा घेत त्यांना फायदा झाला तुम्हालाही फायदा होईल, असे म्हणत, भाग्योदय यंत्र ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहे. धार्मिक संभाषण करून आधी भावनिक करायचे आणि नंतर यंत्राचा बाजार मांडून त्याला ब्लॅकमेल करायचे असा हा प्रकार आहे. याला अनेक नागरिक बळीही पडत आहेत.
टूर चले हम !
जुना गोंदिया येथील रहिवासी अर्जून रावत यांना मोबाईलवर एक फोन आला. आमची बंगलोर येथील प्रसिद्ध टूर कंपनी आहे. कंपनीने मार्च ते मे महिन्यादरम्यान शिमला, मनाली, जम्मू काश्मिरचे टूर आयोजित केले आहे. एका व्यक्तीसाठी १५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, कंपनीने आपली भाग्यशाली ग्राहक म्हणून निवड केली असून पती-पत्नी अशा दोघांसाठी कंपनीतर्फे तुम्हाला भव्य सूट दिली जात असून फक्त २० हजार रुपयात टूरची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला दोन दिवसाच्यात आत कंपनीच्या बँक खात्यात ४० टक्के रक्कम जमा करावी लागेल. हे ऐकूण रावत यांना आनंद झाला. विचार करून सांगतो, असे त्यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला सांगितले. त्यांनी इंटरनेटवर चेक केले असता तशी कंपनीच नसल्याचे स्पष्ट झाले.
कर्जासाठी आपली निवड झाली !
आमची दिल्लीतील एक प्रसिद्ध फायनान्स कंपनी आहे. कंपनीने कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी तुमची निवड केली आहे. एक लाखाचे कर्ज तुम्हाला फक्त तीन टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाईल. कर्ज मिळण्यासाठी आवश्यक ‘प्रोसेसिंग फी’ करिता कर्जाच्या रकमेच्या १० टक्के म्हणजे १० हजार रुपये रोख किंवा चेकद्वारे कंपनीच्या खात्यात जमा करा, त्यानंतर चार दिवसात तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल, असा फोन गोंदिया बाजारपेठेतील कपडा व्यापारी जीवनलाल अग्रवाल यांना आला. अग्रवाल त्यांनी जास्त प्रतिसाद न दिल्यामुळे समोरील व्यक्तीने शिविगाळ करून फोन ठेवला. सतर्कतेमुळे त्यांची फसवणूक टळली. अशा प्रकारचे कॉल्स सध्या मोठ्या प्रमाणात मोबाईलधारकांना येत आहेत. लालसेपोटी समोरची व्यक्ती अशा कॉल्सच्या जाळ््यात अडकतात व पैसे मिळविण्यासाठी आहे त्या रकमेपासूनही हात धुवून बसतात.

Web Title: The 'lucky' customer cheats from mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.