शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ आयुर्वेदिक दवाखान्यांना चार वर्षापासून कुलूप

By admin | Updated: February 12, 2016 02:07 IST

जिल्ह्यात २७ आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल रूग्णालय सुरू आहेत. मात्र १३ वने अंतर्गत असलेले तीन अ‍ॅलोपॅथिक ...

निधी झाला बंद : जि.प.चा चालविण्यास नकारगोंदिया : जिल्ह्यात २७ आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल रूग्णालय सुरू आहेत. मात्र १३ वने अंतर्गत असलेले तीन अ‍ॅलोपॅथिक व सात आयुर्वेदिक असे नऊ रूग्णालय मागील तीन ते चार वर्षांपासून बंद आहेत. निधीअभावी बंद असलेल्या या दवाखान्यांना आपल्या खर्चाने चालविण्यास जिल्हा परिषदेने नकार दिला आहे.जिल्ह्यातील सात आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल दवाखाने बंद झाले आहेत. हे दवाखाने १३ वने या शिर्षांतर्गत सुरू होते. त्यांना वर्षाकाठी एक कोटी रूपयांची गरज होती. परंतु या शिर्षातंर्गत शासनाने निधी देणे बंद केल्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षापासून हे दवाखाने बंद होते. गोंदिया तालुक्यातील मजीतपूर, पांगळी, गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा, सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, आमगाव तालुक्यातील अंजोरा ही सहा आयुर्वेदिक दवाखाने निधीअभावी बंद आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील गिरोला, डोंगरगाव व सुरतोली हे तीन दवाखाने बंद पडलेले आहेत. खोडशिवणी या आयुर्वेदिक दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले आहे. जिल्ह्यात २७ आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. त्यात गोंदिया तालुक्यातील बनाथर, बटाणा, अदासी, चुटीया, धापेवाडा व मुर्दाळा असे सहा आयुर्वेदीक दवाखान्यांचा समावेश आहे. गोरेगाव तालुक्यात घुमर्रा व तेढा येथे, आमगाव तालुक्यात शिवणी, ननसरी, गिरोला व कट्टीपार येथे, सालेकसा तालुक्यात पिपरीया, सोनपुरी, गांधीटोला येथे, देवरी तालुक्यात इडूकचुहा, डोंरगाव, पालांदूर, पुराडा येथे, सडक-अर्जुनी तालुक्यात मंदीटोला, कोसमतोंडी, बोपाबोडी, घाटबोरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ईळदा, बाराभाटी, बोंडगावदेवी, इटखेडा तर तिरोडा तालुक्यात अर्जुनी, गांगला, मुरमाडी व सरांडी येथे आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. आंग्ल दवाखाना आमगाव तालुक्यात चिचटोला, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झरपडा व सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथे सुरू आहेत.