गणेशनगरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:01 IST2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:01:13+5:30
पालकमंत्री देशमुख यांनी शनिवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला खा. पटेल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, विनोद अग्रवाल, सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी उपस्थित होते.

गणेशनगरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गणेशनगर परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर हा परिसर प्रशासनाने सील केला होता. मात्र सदर रुग्ण कोरोनामुक्त झाला असून यानंतरही या भागात कठोर नियम कायम ठेवण्यात आले होते. यामुळे या भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे गणेशनगर परिसरातील नियमात शिथिलता देण्यात यावी, यासंदर्भात खासदार प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी (दि.२५) गणेशनगर परिसरातील नियम शिथिल करु न त्यांना ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करु न दैनंदिन व्यवहार व व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली.
पालकमंत्री देशमुख यांनी शनिवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला खा. पटेल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, विनोद अग्रवाल, सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी उपस्थित होते. बैठकीत खा. पटेल यांनी गणेशनगर परिसरातील जीवनावश्यक वस्तुंचा व्यापार करणारे व्यापारी, वैद्यकीय व्यवसाय करणारे, लहान मोठे व्यापारी रहिवासी डॉक्टर्स यांना गणेशनगर परिसरातून बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यासंबंधी अधिकायाºंसोबत चर्चा केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी यात दिंरगाई केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांना चांगलेच फटकारले. एखाद्या आवश्यक माहितीसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास तो होत नसल्याने लोकप्रतिनिधी व नागरिकांना अडचण निर्माण होत असल्याने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकाºयांनी गणेशनगर परिसरात शनिवारी सायंकाळपासून टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत केले जाईल असे सांगितले. पालकमंत्री देशमुख यांनी याची गांर्भियाने दखल घेत अधिकाºयांना योग्य निर्देश दिले. देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होणार नाही याविषयी चर्चा केली. यावेळी खा. पटेल यांनी रबी हंगामातील धान खरेदीसाठी शासकीय धान खरेदी केंद्र व त्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यास सांगितले. ‘लॉकडाऊन’मुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे यासाठी मग्रारोहयोची कामे त्वरीत सुरू करण्यास सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात यावी, तसेच आरोग्य कर्मचाºयांची पदे भरण्यात यावी, ग्रामीण भागातील गोरगरीबांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा कशा मिळतील याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्या निवेदनावर प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पालकमंत्री देशमुख यांनी यासर्व विषयांवर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तर खा. पटेल यांनी गोरेगाव नगरपंचायत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत तेथील साफसफाईकडे लक्ष देण्यास सांगितले.
मेडिकलच्या डॉक्टरांना ४ महिन्यांचे वेतन
येथील शासकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मागील ६-७ महिन्यांपासून वेतन मिळाले नव्हते. ही बाब डॉक्टरांनी खा. पटेल यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी दोन दिवसांपूर्वी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. यावर त्यांनी ३ मे पर्यंत डॉक्टरांच्या वेतनासाठी ५८ लाख रु पये त्वरित उपलब्ध करु न देण्यात येत असून यातून ४ महिन्यांचे वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तीन हजार पीपीई किट
खा. पटेल यांनी कोरोनासाठी उपाययोजनांवर विस्तृत चर्चा केली. त्यात जिल्ह्यासाठी ३ हजार पीपीई कीटची मागणी केली असून केवळ ३०० किट उपलब्ध झाल्या असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. याची खा. पटेल यांनी गांर्भियाने दखल घेत तातडीने पीपीई किटची मागणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांना दिले.
तेंदूपत्याशी निगडीत घटकांना परवानगी
पूर्व विदर्भात तेंदूपत्ता हंगाम मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे हजारो कुटुंबांना रोजगार मिळतो. तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी ज्या यंत्रणा काम करतात त्यांना जिल्ह्याबाहेर तेंदूपत्याची लोंडीग-अनलोंडीग करण्याची परवानगी देण्यासंदर्भात या वेळी चर्चा झाली. त्यात पोलीस अधीक्षक शिंदे यांनी परवानगी देणार असल्याचे सांगितले.
पटेल यांच्या सहकार्याने मार्ग - विनोद अग्रवाल
गणेशनगर परिसरात प्रशासनाने लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता देण्यात यावी यासाठी मागील १५ दिवसांपासून शासन आणि प्रशासनाकडे आपला पाठपुरावा सुरू होता. अखेर गृहमंत्री देशमुख यांनी शनिवारी या परिसरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल करण्याचे आदेश दिले. यामुळे गणेशनगरवासीयांना दिलासा मिळाला असून यासाठी खा. पटेल यांचे सहकार्य मिळाल्याचे आ. विनोद अग्रवाल यांनी सांगितले.
पाठपुराव्यानंतर निघाला मार्ग - गोपालदास अग्रवाल
गणेशनगर परिसरात प्रशासनाने ‘लॉकडाऊन’चे नियम कठोर केल्याने या भागातील नागरिक व व्यावसायिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विभागीय आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर गणेशनगर परिसरातील ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता दिल्याने तेथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.