शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क वाढ न करण्याचे जिल्ह्यातील २३६ शाळांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाईन शुल्क भरण्याचा पर्याय द्यावा, असे गटशिक्षणाधिकारी शाळांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे सगळीकडे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनाने शैक्षणिक सत्र २०२०-२१ या वर्षात ही वाढ करण्यात येऊ नये, तसेच शुल्क भरण्याकरिता शाळांनी पालकांवर दबाव आणू नये.

ठळक मुद्देखासगी विनाअनुदानित शाळांवर करडी नजर : जि.प.शिक्षण विभागाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षण विभागाने २० मे रोजी एक पत्र काढून जिल्ह्यातील शाळांना शैक्षणिक शुल्का संदर्भात आदेश काढले आहे. त्यात सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात कोणत्याही प्रकारची शुल्क वाढ शाळांनी करू नये असे निर्देश शाळांना दिले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही आणि याबाबत खर्च कमी होणार असल्यास पालकांचे कार्यकारी समितीमध्ये हे ठराव करून त्याप्रमाणे योग्य प्रमाणात शुल्क कमी करावे अशी सूचना सर्व शाळांना केली आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाईन शुल्क भरण्याचा पर्याय द्यावा, असे गटशिक्षणाधिकारी शाळांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे सगळीकडे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनाने शैक्षणिक सत्र २०२०-२१ या वर्षात ही वाढ करण्यात येऊ नये, तसेच शुल्क भरण्याकरिता शाळांनी पालकांवर दबाव आणू नये.महाराष्ट्र शासनाने ८ मे रोजी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थामध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता शुल्क वाढ करू नये यासंदर्भात एक पत्र काढलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू या आजाराला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे.या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात साथरोग अधिनियम १९९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. सद्या राज्यात लॉकडाऊन सुरू असताना काही शाळा, संस्था विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेचे शुल्क भरण्याची सक्ती करीत असल्याच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थी व पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाचे शुल्क जमा करण्यासंदर्भात सक्ती करू नये असे निर्देश दिले आहे.लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर शुल्क जमा कराकोरोनाचा प्रादुर्भावामुळे अद्यापही लॉकडाऊन सुरूच आहे.त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर शुल्क जमा करण्याच्या सूचना पालक आणि शाळांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था विनिमय अधिनियम २०११ मधील कलम २१ अन्वये प्राप्त अधिकारान्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये प्राप्त अधिकारान्वये शासन निर्णय काढण्यात आला आहे. सन २०१९-२० व २०२०-२१ मधील दिली जाणारी किंवा शिल्लक असणारे वार्षिक शुल्क एकदाच न घेता मासिक, त्रेमासिक जमा करण्याचा पर्याय देण्याच्या सूचना शासनाने केल्या आहे.तर शुल्क ही करा कमीशैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोणतेही शुल्क वाढवू नये, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जर काही ही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही तर त्याबाबताचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये हे ठराव करून त्याप्रमाणे योग्य प्रमाणात शुल्क कमी करावे असे निर्देश दिले आहे. लॉकडाऊच्या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांनी ऑनलाईन शुल्क जमा करावा हा आदेश पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सोयीने लागू राहणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा