शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅनची सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणून सॅनिटायझरयुक्त पोलीस वाहन सज्ज करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदर चार तासाने सॅनिटायजर :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात आणि राज्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशान्वये २३ मार्च अन्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणून सॅनिटायझरयुक्त पोलीस वाहन सज्ज करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व आंतरराज्य व इतर जिल्ह्यांची सीमा आवागमन करीता पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनला महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी पाईंट लावण्यात आहेत. पोलीस स्टेशन गोंदिया शहरातंर्गत जयस्तंभ चौक गोंदिया, नेहरू चौक, आदर्श सिंधी स्कूल सावराटोली गोंदिया असे ३ ठिकाणी, पोलीस स्टेशन रामनगर अंतर्गत कुडवा नाका, पाल चौक, विशाल मेगामार्ट असे ३ ठिकाणी, पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण अंतर्गत कारंजा टी पार्इंट, फुलचूर नाका, पतंगा चेकपोस्ट, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत देव्हाडा, आंतरराज्यीय चेकपोस्ट बोंडराणी, पोलीस स्टेशन कोरणीघाट, पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत आंतरजिल्हा अंतर्गत आंतरराज्य लांजी रोड माल्ही, आंतरजिल्हा घाटटेमणी अशा २ ठिकाणी, पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत भातगिरणी चौक, लांजी रोड साखरीटोला असे २ ठिकाणी, पोलीस स्टेशन गोरेगाव अंतर्गत बस स्टॉप चौक, पोस्ट देवरी अंतर्गत आंतरराज्य चेकपोस्ट सिरपूर, पोलीस स्टेशन डुग्गीपार अंतर्गत आंतरजिल्हा सौंदड बॉर्डर,पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव आंतरजिल्हा चेक पोस्ट गौरनगर, पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत आंतरजिल्हा चेक पोस्ट केशोरी टी पाईंट व पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे टी पार्इंट येथे नाकाबंदी लावण्यात आली आहे. प्रत्येक येणाºया-जाणाºया वाहनांची व व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त आढळून येणारे वाहन व व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता खबरदारी म्हणून बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी गोंदिया पोलीस दलामार्फत ८ एप्रिल रोजी सॅनिटायझर व्हॅन सुरू करण्यात आली आहे. सर्व नाकाबंदी पाईंटवर जाऊन दर ४ तासांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सॅनिटायझ करणार आहेत. सॅनिटायझर व्हॅनमुळे निश्चितच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यास मदत होईल.नागरिकांनो आदेशाचे पालन करागोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आदेशाचे पालन करा असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्याने व दिनांक १४ एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन सुरू असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर जावू नये त्यांनी घरातच राहावे. वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या