शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात ‘मॉड्युलर’ प्रसुतीगृह सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 00:53 IST

तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात मॉड्युलर प्रसूतीगृह सुरू करण्यात आले असून त्यात प्रसूती रूग्णाला सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत.

महिनाभरात ३९ प्रसुती : १०० खाटांचा प्रस्ताव मंत्रालयात गोंदिया : तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात मॉड्युलर प्रसूतीगृह सुरू करण्यात आले असून त्यात प्रसूती रूग्णाला सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत. विशेष म्हणजे नवीन आर्थिक वर्ष २०१७-१८ पहिल्याच एप्रिल महिन्यात तब्बल ३९ प्रसूती तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात उपजिल्हा रूग्णालयात १३ सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून जननी सुरक्षा योजनेच्या कामात जिल्ह्यात अव्वल स्थान असल्याचेही सांगण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या टीम वर्कने एकही गुंतागुंत होवू न देता गरोदर रूग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरविली आहे. पूर्वी प्रसूतीगृह म्हटले की एक खाट असायची व साधारण सुविधा असायचे. मात्र आता सुरू करण्यात आलेल्या सुसज्ज प्रसूतीगृहात स्टॅन्डर्ड आॅपरेटिंग सिस्टिमसह रूग्णांसाठी आरोग्य विषयक सूचना व मार्गदर्शन, डॉक्टरांसाठी मार्गदर्शन, शौचालयापासून ते इतर सर्व बाबींनी सोयीसुविधायुक्त बाबींचा समावेश त्यात आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी वेळोवेळी केलेल्या आवश्यक सूचनेप्रमाणे जिल्ह्यात शून्य मातामृत्यू व शून्य बालमृत्यू अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात तत्पर व योग्य सेवा देवून या अभियानाला यशस्वी करण्यासाठी हातभार लावत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रूग्णालयातील मॉड्युलर प्रसूतीगृहाचे उद्घाटन नुकतेच आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. याचा लाभा आता रूग्णांना मिळू लागला आहे. आमदार रहांगडाले यांच्या विशेष प्रयत्नाने सद्यस्थितीत ५० खाटांचे असलेल्या तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून १०० खाटांचे सुसज्ज रूग्णालय भविष्यात होण्याच्या मार्गावर आहे. त्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालय मुंबई येथे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे कायाकल्प योजनेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आलेल्या या रूग्णालयाच्या सोयीसुविधेकडे शासन-प्रशासनाने आणखी लक्ष पुरविल्यास या रूग्णालयातून गंभीर रूग्णांना इतरत्र न हलविता तेथेच औषधोपचार केला जावू शकेल. (प्रतिनिधी)