गोंदिया : महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोनमधील बेस कॅम्प मुरकूटडोह भागातील टाकेझरी-बेवारटोला डॅम जंगल परिसरातून नक्षलवाद्यांनी लपविलेला शस्त्रसाठा व स्फोटके गोंदिया पोलिसांनी हस्तगत केली. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर राबविलेल्या अभियानात एके-४७, एसएलआरसह अनेक शस्त्रे व स्फोटक साहित्य सापडल्याची माहिती शुक्रवारी (दि. ३०) गोंदिया पोलिस दलाने दिली.
महाराष्ट्र शासनाने २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली आहे. हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येणाऱ्यांना सुखमय आयुष्य जगण्याची संधी मिळते. या योजनेंतर्गत २८ नोव्हेंबर २०२५ रोजी एमएमसी झोनचे प्रवक्ता व एसझेडसीएम अनंत ऊर्फ विकास नवज्योत नागपुरे याने १० साथीदारांसह तर १३ डिसेंबर २०२५ रोजी दरेकसा एरिया कमिटी कमांडर रोशन बेडजा याने २ साथीदारांसह आत्मसमर्पण केले. जीआरबी डिव्हिजनमधील दरेकसा एरिया कमिटीजवळील एकूण १४ नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीवरून गोंदिया पोलिसांनी मुरकूटडोह भागातील टाकेझरी-बेवारटोला डॅम जंगल परिसरात छापा टाकला. यात माओवाद्यांनी भूमिगत केलेला डम्प सापडला.
हस्तगत केलेल्या साहित्यात याचा समावेशडम्पमधून एके-४७ रायफल १, एसएलआर रायफल २, ४५ कोल्ट ऑटोमॅटिक पिस्टल १, १२ बोर रायफल १, क्लेमोर मायन १, एके-४७ मॅगझिन ३, एसएलआर मॅगझिन ९, इन्सास मॅगझिन १, एसएलआर राउंड १८७, एके-४७ राउंड ५८, इन्सास राउंड १५, ३०३ रायफल राउंड ३५, ८ एमएम राउंड १२, कोल्ट पिस्टल राउंड १४, बीजीएल शेल्स ४, सुरका शेल्स १०, सुरका लॉन्चर राउंड १०, स्फोटक पदार्थ ८.५ किलो, लोखंडी छर्रे ८३, सोलर प्लेट २, वायर बंडल २, वॉकीटॉकी १, बॅटरी ५, कलर प्रिंटर १, डेटोनेटर, कॉर्डेक्स वायरसह आदीचा समावेश आहे.
..यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. प्रमोद भातनाते, स.पो.नि. संजय नाईक, पोउपनि श्रीकांत हत्तीमारे, पो.हवा. लक्ष्मण घरत, मुस्ताक सय्यद, पो.शि. रमेश उईके, पो.शि. राजेश तावाडे व सी-६० झोडे पथकाने यशस्वी केली.
Web Summary : Based on surrendered Naxalites' intel, police seized a large arms cache, including AK-47s and explosives, from the Murkutdoh forest area. The operation, conducted in the Takazari-Bewartola dam area, yielded a significant amount of weaponry.
Web Summary : आत्मसमर्पित नक्सलियों की जानकारी पर, पुलिस ने मुरकुटडोह जंगल क्षेत्र से एके-47 और विस्फोटकों सहित हथियारों का एक बड़ा जखीरा जब्त किया। ताकेज़री-बेवारटोला बांध क्षेत्र में चलाए गए अभियान में भारी मात्रा में हथियार बरामद हुए।