शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तलाव खोलीकरणाच्या कामाला सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता गेल्या २२ मार्चपासून संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. आता हळुवार सुरूवात होत आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगारासाठीचा एकमेव आधार म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असून ही कामे बंद असल्याने ग्रामीण भागातील जनता अडचणीत आली आहे.

ठळक मुद्दे१३८६ मजुरांच्या हाताला काम : कुंभरे तलाव व मिरगी बोडीचे खोलीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसंधारण प्रकारातील ढेकलु कुंभरे तलावाच्या खोलीकरणाचे काम शुक्रवारी (दि.२९) तर मिरगी बोडी खोलीकरणाचे काम शनिवारी (दि.३०) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या २ महिन्यांपासून हातावर हात मांडून बसलेल्या शेकडो मजुरांच्या हाताला मनरेगामुळे काम मिळाले आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता गेल्या २२ मार्चपासून संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. आता हळुवार सुरूवात होत आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगारासाठीचा एकमेव आधार म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असून ही कामे बंद असल्याने ग्रामीण भागातील जनता अडचणीत आली आहे. कामे नसल्यामुळे ग्रामीण जनता हातावर हात देऊन घरी बसले होते. त्यामुळे ना-रोजी, ना-रोटी अशी हलाखीची अवस्था ग्रामीण भागातील मजुरांची झाली होती.अशा हलाखीच्या वेळी शुक्रवारी (दि.२९) नवेगावबांध येथे तलाव खोलीकरणाचे काम सुरू झाले. त्यामुळे मागील २ महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. या कामावर अकुशल चार लाख ६४ हजार तर कुशल १८ हजार ३७६ असे एकूण चार लाख ८३ हजार ३७९ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामावर गावातील २१४ पुरुष तर ५२३ महिला असे एकूण ७३७ मजूर काम करीत आहेत. तर मिरगी बोडी खोलीकरण कामावर २४३ पुरुष व ४०६ महिला असे एकूण ६४९ मजूर आहेत.या कामावर अकुशल चार लाख ८७ हजार ४८५ रु पये तर कुशल पाच हजार ४२९ असे एकूण चार लाख ९२ हजार ९१४ रु पये खर्च करण्यात येणार आहेत. या दोन्ही कामांतून चार हजार ६२३ मनुष्य दिवस काम गावातील मजुरांना मिळणार आहे. या कामांवर गावातील एक हजार ३८६ मजुरांना काम मिळाले आहे असून त्यांना आर्थिक हातभार लागला आहे.एकाच कामावर जास्त गर्दी होऊ नये, यासाठी मनरेगा अंतर्गत तलाव खोलीकरणाच्या कामासह ३ कामे सुरू करण्यात आली आहे. तोंडावर रुमाल किंवा मास्क बांधूनच स्त्री-पुरु ष मजुरांनी कामावर यावे अशा सूचना दिलेल्या आहेत. सॅनिटायझर, हात धुण्याचे पाणी व प्राथमिक उपचाराची व्यवस्था कामावर करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे याची काळजी घेतली जात आहे.-विलीन बडोले , रोजगार सेवक, नवेगावबांध.

टॅग्स :Waterपाणी