शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

खरेदी केंद्रावरील धानाला ताडपत्र्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:07 AM

जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र्यांचा आधार आहे.

ठळक मुद्देनुकसानीची शक्यता : गोदामांची अद्यापही व्यवस्था नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा फटका काही प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला.या मंडळाच्या जवळपास ४६ केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून असून त्यांना केवळ ताडपत्र्यांचा आधार आहे. अवकाळी पावसामुळे धान ओला होऊन नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातो.आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र दरवर्षी या विभागातर्फे खरेदी करण्यात येणारा धान सुरक्षीत ठेवण्यासाठी गोदामाची अडचण कायम असते. आठ वर्षांपूर्वी खरेदी केंद्रावरील धान उघड्यावर पडून असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र यानंतरही शासनाने कसलाच धडा घेतलेला नाही. यंदा आदिवासी विकास महामंडळाने एकूण ४६ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. आत्तापर्यंत या केंद्रावरुन २ लाख ४९ हजार ९५७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश धान गोदामाअभावी खरेदी केंद्रावरच पडला आहे. धानाच्या सुरक्षेकरीता ताडपत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला. पावसामुळे काही केंद्रावरील धान ओले झाल्याची माहिती आहे.मात्र या संदर्भात या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पावसामुळे धानाचे नुकसान झाले नसल्याचे सांगितले. तसेच शासकीय धान खरेदी केंद्रावर ताडपत्र्या उपलब्ध करुन देण्यात आल्या असून गोदामाची व्यवस्था लवकरच केली जाणार असल्याचे सांगितले.दरवर्षी अवकाळी पावसामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावरील धान भिजतात. मात्र यानंतरही केंद्र सुरू झाल्यानंतरही गोदामांची व्यवस्था करण्याचा विसर या विभागाला पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नुकसान झाल्यावर दखल घेणार का?आदिवासी विकास महामंडळाकडून दरवर्षी धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतरही गोदामांची व्यवस्था केली जात नाही. परिणामी खरेदी केलेला लाखो क्विंटल धान केवळ ताडपत्र्यांच्या भरोश्यावर उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळे दरवर्षी या विभागाला लाखो रुपयांचे नुकसान देखील सहन करावे लागते. मात्र यानंतरही याची दखल घेतली नाही. त्यामुळे नुकसान झाल्यावर दखल घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.शेतकऱ्यांना कोण देणार नुकसान भरपाई?शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच बारदाण्याच्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच खरेदी केंद्रावर शेड अथवा पुरेशा प्रमाणात ताडपत्र्यांची सोय नसल्याने धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना विविध गैरसोयीेंना तोंड द्यावे लागत आहे. धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याचे धान काटा करण्यापूर्वीच भिजल्यास त्यांना नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.बारदाण्याअभावी धान उघड्यावरआदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाण्याची समस्या सुटली नाही. परिणामी शेतकºयांना विक्रीसाठी आणलेला धान उघड्यावर ठेवावा लागत आहे. रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या धानाला सुध्दा बसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डRainपाऊस