शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

अवैध विक्री करताना केरोसीन पकडले

By admin | Updated: October 29, 2015 00:20 IST

सडक-अर्जुनीजवळ असलेल्या मौजा वडेगाव येथे अवैध केरोसिन विकत असताना पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत जवळपास ५० लिटर केरोसिन पकडण्यात आले.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न : गावकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारासडक-अर्जुनी : सडक-अर्जुनीजवळ असलेल्या मौजा वडेगाव येथे अवैध केरोसिन विकत असताना पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत जवळपास ५० लिटर केरोसिन पकडण्यात आले. मात्र अवैध केरोसिन विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी तक्रार गावकऱ्यांनी करून योग्य चौकशीची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, वडेगाव सडक येथील स्वस्त धान्य व केरोसिन वाटपाचे दुकान गिरीपाल ताराचंद फुले मु.वडेगाव यांचेकडे आहे. १५ आॅक्टोबर २०१५ ला रात्रीला १०.१५ वाजता गिरीपला फुले यांचे घरी ५० लिटर केरोसीन विकताना पकडण्यात आले. यावेळी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पठाण आणि तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मेश्राम उपस्थित होते. यावेळी गावातील २५ ते ३० नागरिक हजर होते. परंतु चोरीने केरोसिन विकत असताना त्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला नाही व नागरिकांच्या सह्यासुध्दा घेतल्या नाही. त्यामुळे गावातील नागरिकांचा संशय वाढला आणि त्यांनी तहसीलदार व्ही.एम.परळीकर, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजकुमार केंद्रे यांना विचारणा केली असता संबंधित केरोसिन विक्रेत्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांना कळले. सदर स्वस्त धान्य दुकानदार गावातील कार्डधारकांना स्वस्त धान्य कमी देतो, तसेच केरोसिनही कमी वाटप करतो. उरलेला माल काळ्या बाजारात विक्री केला जाते. अशा स्वस्त धान्य दुकानदारावर योग्य चौकशी करून कार्यवाही करावी, अन्यथा गावकरी आंदोलन करतील, अशी तक्रार गावकऱ्यांनी तहसीलदार सडक-अर्जुनी यांना केली. त्या तक्रारीच्या प्रतिलिपी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक गोंदिया, जि.प. सदस्य डव्वा, उपविभागीय अधिकारी देवरी यांना पाठवण्यात आला आहे. या तक्रार निवेदनावर गावातील ५७ स्त्री-पुरूषांनी सह्या केल्या आहे. चौकशी होणार की नाही याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. योग्य चौकशी न झाल्यास अधिकाऱ्यांचा खरा चेहरा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)