शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

जय सेवाच्या गजराने दुमदुमले कचारगड

By admin | Updated: February 1, 2015 22:58 IST

अखिल भारतीय आदिवासी गोंड समाजाचे उगमस्थळ असलेले कचारगड येथे रविवारी सकाळपासून देशभरातील कान्याकोपऱ्यातून आदिवासी भाविकांचे आगमन झाले.

सालेकसा : अखिल भारतीय आदिवासी गोंड समाजाचे उगमस्थळ असलेले कचारगड येथे रविवारी सकाळपासून देशभरातील कान्याकोपऱ्यातून आदिवासी भाविकांचे आगमन झाले. जय सेवा जय गोंडवाना जय फडावेनचा गजर कचारगड परिसरात झाला.गोंडी धर्माचे सप्तरंगी ध्वज घेऊन येणाऱ्या भाविकाने सर्व रस्ते फुलून गेले होते. सायंकाळपर्यंत जवळपास एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी कचारगडला हजेरी लावली. दुपारी १२ वाजता आ. संजय पुराम यांच्या हस्ते राष्ट्रीय गोंडवाना ध्वज फडविण्यात आला. दुपारी १२.३० वाजता गोंडी धर्माचार्य मोती रावण कंगाली यांच्या हस्ते गोंडी धर्माचे प्रतिक असलेले सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आले. धनेगाव ते कचारगड चार किमी पर्यंत ढोल ताशाच्या गजर करण्यात आला. विधिवत कचारगड यात्रेला सुरूवात झाली. कचारगड यात्रेचा शुभारंभापूर्वी गोंडी धर्माचार्य भूमाल (पुजारी) यांच्या मार्गदर्शनात राणी दुर्गावती व गोंडी देवी-देवतांचे पूजन व नमन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष दादा हिरासिंग मरकाम, गोंड राजे वासूदेव शाह टेकाम, कचारगडचे संशोधक एड.मरस्कोल्हे, छत्तीसगड येथील गोंडी इतिहासकार बी.एल. कोराम, आदिवासी सेवक मोहन पंधरे, यवतमाल येथील उपायुक्त किशोर कुंभरे, झारखंड येथील आ. विमला प्रधान,गुरूचरण नायक, फत्तेसिंह कमलेश, पतिराम ताराम यांच्या नेतृत्वात हजारोच्या संख्येत आदिवासी महिला-पुरूष व आबालवृध्द भाविक यात्रेत सहभागी झाले. माता कंकाली देवी, जसेमाल लिंगोबाबाची प्राकृतीक पूजा करण्यात आली. दरवर्षी आद्य पौर्णिमेला देशभरातील आदिवासी कचारगड येथे येतात. या ठिकाणी आपल्या पूर्वजाना नवस फेडून नवीन ऊर्जा घेऊन जाताना कार्य करण्यासाठी आठवणी सोबत नेतात. वर्षभर आपली नोकरी, व्यवसाय, शेती व इतर कोणतीही कामे व्यवस्थीत करण्यास मदत मिळते अशी या ठिकाणी योजने भाविक आपली मते मांडतात. आदिवासीचे आराध्य दैवताचे वास्तव्य नैसर्गिक स्थळात असल्यामुळे प्रत्येक भाविकाला नवीन उर्जा मिळत असते. कचारगड येथे आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असल्याने गैरआदिवासी लोकही मोठ्या संख्येत गुफा पाहण्यासाठी येतात. त्यामुळे लोकांची संख्या लाखोवर आहे. पाच दिवसीय यात्रेदरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार येथील चार ते पाच लाख भाविक येतात. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, अरूणाचल कडील उत्तरपूर्वी राज्याचे भाविकही हजेरी लावतात.(प्रतिनिधी)