शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

तीनही घटकांना एकत्रित आणणारा जयंती उत्सव

By admin | Updated: April 2, 2015 01:15 IST

जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आणि २४ वे तिर्थंकर भगवान महाविरांचा जयंती उत्सव साजरा करण्याची गोंदियात अनोखी परंपरा आहे.

लोकमत दिन विशेषमनोज ताजने गोंदियाजैन धर्मियांचे श्रद्धास्थान आणि २४ वे तिर्थंकर भगवान महाविरांचा जयंती उत्सव साजरा करण्याची गोंदियात अनोखी परंपरा आहे. केवळ दिगंबरपंथीयच नाही तर श्वेतांबर आणि स्थानकवासी अशा तीनही घटकांचा सहभाग असणारा हा जयंती उत्सव गोंदियावासीयांसाठी एक आदर्श उत्सव ठरत आहे.साधारणत: ११० वर्षापूर्वी गोंदियात जैन समाजाची ४-५ घरे होती. गोंदियाच्या मुख्य मार्केट परिसरात राहणाऱ्या त्यापैकी एका परिवाराने गोरेलाल चौकातील आपली जागा जैन समाजाला दान देऊन तिथे दिगंबर जैन मंदिराची उभारणी केली. तेव्हापासून दरवर्षी महावीर जयंतीचा कार्यक्रम या मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.सकाळी ७ वाजता प्रभातफेरी, दुपारी शोभायात्रा, सरकारी रुग्णांलयांमधील रुग्णांना फळांचे वाटप, समाजबांधवांचे सामूहिक भोजन आणि संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर असते. या कार्यक्रमांसाठी जैन मंदिराचे मुख्य ट्रस्टी आ.राजेंद्र जैन यांच्यासह ट्रस्टी सीए विनोद जैन, सुकूमार जैन, अशोक जैन यांचा विशेष पुढाकार व मार्गदर्शन असते.गोंदियात भगवान महावीरांची जयंती सर्व समाजबांधवांच्या एकोप्याने आणि मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. सर्व पंथियांचे लोक त्यात सहभागी होतात आणि भगवान महावीरांच्या शिकवणीनुसार आचरण करण्याचा संकल्प करतात.जैन मंदिच्या उभारणीनंतर येथे दरवर्षी पर्युषण पर्व, वर्षातून तीन वेळा सिद्धचक्र विधान सोहळा होतो. याशिवाय मुनी महाराजांचा मुक्काम आणि समाजबांधवांसाठी प्रवचनाचा कार्यक्रम होत असतो. गोंदियात आज जैन समाजाची लोकसंख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे हे जैन मंदिर सर्वांसाठी श्रद्धास्थान आहे. इतर समाजातील लोकही येथे श्रद्धेने नतमस्तक होतात.जैन मंदिराचा जीर्णोद्धारमुख्य मार्केट परिसर असलेल्या गोरेलाल चौकातील जवळपास २००० वर्ग फूट जागेवर ११० वर्षापूर्वी छोटेसे मंदिर बांधले होते. मात्र २००६ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्वार करण्यात आला. आता हे तीन मजली आकर्षक मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. यात तळमजल्यावर भगवान आदीनाथ, भगवान भरत आणि भगवान बाहुबलींची मूर्ती, पहिल्या मजल्यावर भगवान आदिनाथ, मूल्यनायक चंद्रप्रभ भगवान आणि भगवान महावीरांची तर दुसऱ्या मजल्यावर पद्मप्रभ भगवानासह सर्व तिर्थंकराच्या मूर्त्या आहेत.मंदिराचा जीर्णोद्वार करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च लागल्याचे सांगितले जाते. जबलपूरचे अभियंता सुनील जैन यांनी या मंदिराचे डिझाईन तयार केले. त्यासाठी त्यांनी राजस्थान व मध्यप्रदेशातील काही जैन मंदिरांचा अभ्यास केला. याशिवाय आतील काचेचे काम सुभाषकुमार कुमावत यांनी केले.