शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

सात घरांवर चालविला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

मोठ्या उड्डाणपुला पलीकडील म्हणजेच गोंदिया शहराच्या अर्ध्या भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी रामनगर पोलीस ठाण्याकडे आहे. मात्र असे असतानाही रामनगर पोलीस ठाणे अत्यंत तोकड्या जागेत चालविले जात आहे. अशात पोलीस ठाण्यांची स्वत:ची प्रशस्त आणि सुसज्ज इमारत तयार करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

ठळक मुद्देठाण्याच्या इमारतीसाठी काढले अतिक्रमण : अन्य अतिक्रमणधारकांनाही इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रामगर पोलीस ठाण्यासाठी देण्यात आलेल्या जागेवरील अतिक्रमण अखेर नगर परिषदेने बुधवारी (दि.६) काढले. यांतर्गत सात घरांवर नगर परिषदेचा जेसीबी चालला. तर अन्य काही अतिक्रमणधारकांनाही त्यांचे अतिक्रमण काढण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.मोठ्या उड्डाणपुला पलीकडील म्हणजेच गोंदिया शहराच्या अर्ध्या भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी रामनगर पोलीस ठाण्याकडे आहे. मात्र असे असतानाही रामनगर पोलीस ठाणे अत्यंत तोकड्या जागेत चालविले जात आहे. अशात पोलीस ठाण्यांची स्वत:ची प्रशस्त आणि सुसज्ज इमारत तयार करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली व नगर परिषदेची रामनगर शाळेतील समोरील जागा पोलीस ठाण्यासाठी देण्यात आली. त्या जागेची मोजणी १६ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आली होती. आता पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू करावयाचे आहे. मात्र त्या जागेवर काहींनी अतिक्रमण करून घरे तयार केली आहेत.सहा घरे आणि इतर मालमत्ता अतिक्रमणात येत असल्याने त्यांना वर्षभरापूर्वी नोटीस देण्यात आले. तरिही त्यांनी अतिक्रमण काढले नाही व अशात नगर परिषदेच्या पथकाने बुधवारी (दि.६) अतिक्रमण काढण्यासाठी धडक दिली. यात सात घरांवर नगर परिषदेचा जेसीबी चालला. तसेच अन्य अतिक्रमणधारकांनाही अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्यांचे अतिक्रमण काढण्यात आले त्यांच्याकडे इतरत्र जागा असल्यास त्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधून देण्यात येतील असे नगर परिषदेचे म्हणणे आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण