शिक्षणातूनच सर्वांगिण विकास साधता येतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:09+5:30
आश्रमशाळेत आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एच.के. किरणापुरे, शिक्षिका जी.आर.शेंडे, एस.डी. लेंडे व अधीक्षक के.व्ही. कांबळे उपस्थित होते. सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचे पूजन, दीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.

शिक्षणातूनच सर्वांगिण विकास साधता येतो
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा कोयलारी : चांगले जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला ज्ञानाची नितांत गरज आहे. यासाठी सक्तीची शिक्षण पद्धत राबविली जाते. शिक्षणातूनच सर्वांगिण विकास साधता येतो असे प्रतिपादन प्रा.आर.व्ही.ब्राम्हणकर यांनी केले.
येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एच.के. किरणापुरे, शिक्षिका जी.आर.शेंडे, एस.डी. लेंडे व अधीक्षक के.व्ही. कांबळे उपस्थित होते. सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राचे पूजन, दीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी प्रतिनिधीक स्वरुपात बालिका सावित्रीबाई म्हणून आली व पाहुण्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेषभूषेतील विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक किरणापुरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाप्रसंगी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित लघुनाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन विद्यार्थिनी आशा राऊत हिने केले. आभार भारती सिरसाम यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक एस.के. मानवटकर यांनी सहकार्य केले.