शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी विमानतळ सुरक्षारक्षकांचा मुद्दा जाणार दिल्लीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:00 IST

जवळील बिरसी विमानतळ येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत २३ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. अशात नोकरीवर परत घ्यावे, अशी मागणी करीत ते आपल्या कुटुंबीयांसह १९ जानेवारीपासून आंदोलनाला बसले आहेत. यावर शनिवारी (दि. ६) खासदार मेंढे व आमदार अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, मगील १५ वर्षांपासून सेवा देत असलेल्या या कर्मचाऱ्यांना अचानक काढून त्यांच्या जागी ३७ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले आहे.

ठळक मुद्दे नोकरीसाठी सुरू आहे आंदोलन : खासदार मेंढे व आमदार अग्रवाल यांनी दिली भेट

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया ­: जवळील बिरसी विमानतळ येथून नोकरीवरून काढण्यात आलेले २३ सुरक्षारक्षक कर्मचारी नोकरीवर पुन्हा घेण्यात यावे, या मागणीसाठी आपल्या कुटुंबियांसह १९ जानेवारीपासून विमानतळाबाहेर आंदोलनाला बसले आहेत. त्यांची बिरसी विमानतळ प्राधिकरण समिती अध्यक्ष खासदार सुनील मेंढे व आमदार विनोद अग्रवाल यांनी शनिवारी (दि. ६) भेट घेतली. याप्रसंगी खासदार मेंढे यांनी आता त्यांचा मुद्दा दिल्ले येथे मांडणार असून, मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. जवळील बिरसी विमानतळ येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत २३ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. अशात नोकरीवर परत घ्यावे, अशी मागणी करीत ते आपल्या कुटुंबीयांसह १९ जानेवारीपासून आंदोलनाला बसले आहेत. यावर शनिवारी (दि. ६) खासदार मेंढे व आमदार अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, मगील १५ वर्षांपासून सेवा देत असलेल्या या कर्मचाऱ्यांना अचानक काढून त्यांच्या जागी ३७ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले आहे. सन १००४ पासून डीजीआर कायदा लागू असताना त्यांना १५ वर्षे कामावर न हटविता आता अचानक हटवून धोका करण्यात आला असल्याचे आमदार अग्रवाल यांनी खासदार मेंढे यांना सांगत त्यांचे याकडे लक्ष केंद्रीत केले. त्याचप्रकारे, विमानतळात आपली जागा गमावून बसलेले १०६ प्रकल्पग्रस्त परिवार पुनर्वसन व मोबदल्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. विमानतळ प्राधिकरणाकडून पैसा दिल्यानंतरही जिल्हा प्रशासनाकडून त्यांना मोबदल्याची रक्कम दिली जात नसल्याचेही आमदार अग्रवाल यांनी सांगीतले. तसेच यांना नोकरीवर घेण्यासाठी  आता दिल्ली येथे डीजीआर व सीएमडी सोबत बैठक घेऊन समाधान करावे. शिवाय १०६ प्रकल्पग्रस्त कुटुुंबांना मोबदल्याची रक्कम सन २००७ च्या दराने न देता वर्तमान दराने वाढवून देत २३ सुविधांच्या शर्तीनुसार त्यांना पुनर्वसाचा लाभ द्यावा, असे सांगितले. यावर खासदार मेंढे यांनी, लवकरच आमदार अग्रवाल यांच्या उपस्थितीत बिरसी विमानतळ प्राधिकरण, डीजीआर व सीएमडी अधिकाऱ्यांची दिल्ली येथे बैठक घेणार व यामध्ये आंदोलकर्त्या कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राहणार असे सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर परत घ्यावे, यासाठी मी सोबत असल्याचेही आश्वासन दिले. 

प्रकल्पग्रस्तांसाठी १८ व १९ रोजी बैठक याप्रसंगी खासदार मेंढे यांनी १०६ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांना वाढवून मोबदला मिळावा व सर्व सुविधा त्यांना मिळाव्यात, यासाठी १८ व १९ तारखेला जिल्हा प्रशासन तसेच विमानपत्तन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत आंदोलन स्थळी संयुक्त बैठक करणार असे सांगितले. या प्रकरणातही त्यांचे समाधान त्वरित व्हावे, यासाठी चर्चा केली जाईल, असे आ‌श्वासन त्यांनी दिले.

 

टॅग्स :Airportविमानतळ