लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी घटना डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात घडली असून, वडिलांनीच आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात पीडित मुलीने येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. आरोपीची (४०) पत्नी मागील दहा वर्षांपासून माहेरी राहत असून, आरोपीसोबत घरात मुलगी, मुलगा आणि आरोपीची आई राहत होते.
मुलगी लहान असल्याने बापासोबतच झोपत होती आणि याचाच फायदा घेत आरोपी बापाने विकृतपणे तिच्यावर अत्याचार केला. काही महिन्यांपासून पोटात अस्वस्थता जाणवल्यानंतर मुलीला येथील महिला रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. डुग्गीपार पोलिस ठाण्यात आरोपी बापावर लैंगिक बाल शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला बुधवारी (दि.१९) अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (दि.२१) पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Web Summary : In Gondia, a father sexually abused his 14-year-old daughter, who gave birth. The accused father was arrested under child protection laws and is in judicial custody. The mother has been living separately for ten years.
Web Summary : गोंदिया में, एक पिता ने अपनी 14 वर्षीय बेटी का यौन शोषण किया, जिसने एक बच्चे को जन्म दिया। आरोपी पिता को बाल संरक्षण कानूनों के तहत गिरफ्तार किया गया है और वह न्यायिक हिरासत में है। माँ दस साल से अलग रह रही है।