शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेच्या कामात अनियमितता

By admin | Updated: October 7, 2015 00:29 IST

तिरोडा तालुक्यातील ैपरसवाडा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत केलेल्या कामात तत्कालीन सरपंच मणिराम हिंगे यांनी अनियमितता केली आहे

अधिकाऱ्यांकडे तक्रार: पाण्यासाठी नागरिकांची ओरडइंदोरा बु. : तिरोडा तालुक्यातील ैपरसवाडा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत केलेल्या कामात तत्कालीन सरपंच मणिराम हिंगे यांनी अनियमितता केली आहे. या कामात अनेक गैरप्रकार झाल्याची तक्रार माजी सरपंच चंदन वासनिक व राकेश वैद्य यांनी केली आहे.जिल्हा ग्रामीण पुरवठा अधिकारी गोंदिया, मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया तसेच खंडविकास अधिकारी तिरोडा यांना दिलेल्या तक्रारीत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. परसवाडा येथे सन २०१०-११ या वर्षी ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत ५० लाख रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आले. या अगोदर सन २००१-०२ या वर्षा पासून या गावात जलस्वराज प्रकल्पांतर्गत चांदोरी खुर्द येथुन परसवाडा पर्यंत संपूर्ण गावात पाणी पुरवठा योजना सुरू होती. सन २०१०-११ मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत तत्कालीन सरपंच व सध्याचे उपसरपंच मनिराम हिंगे यांनी ५० लाख रुपयाची योजना राबवितांना अनेक ठिकाणी पाईप लाईन नवीन न खोदता बिले मंजूर करून घेतली. शिल्लक असलेले १ हजार फूट पाईप स्वत:च्या शेती मध्ये उपयोगात आणले असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. माहितीच्या अधिकारीखाली मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी पाईप लाईन खोदली नाही व नवीन पाईप लावलेच नाही तरी देखील ग्रामविकास अधिकारी तुरकर यांनी मोजमाप पुस्तीके मध्ये नोंद केली व बिलाची उचल केली आहे. नागरिक श्रीपत ठवकर व घनश्याम ठवकर यांच्या घरापर्यंत पाणी पुरवठा पाईप लाईन असुन सुद्धा घरेलू पाणी पुरवठ्याची जोडणी केली. ग्राम विकास अधिकारी यांनी नामंजूर केली. उपसरपंच मनिराम हिंगे यांच्या शेतावरील बोरवेलच्या पाईपला ग्राम पंचायतची पाईप लाइन जोडून विद्युत वितरण कंपनी परसवाडा यांनी खाजगीरित्या मासिक दराने पाणी पुरवठा केला आहे. ग्रा. पं.द्वारे खरेदी केलेल्या मोटारपंपचा उपयोग उपसरपंच स्वत:च्या शेतीसाठी करीत असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत निधी आली व योजना कार्यान्वीत असतांना सुद्धा ग्राम विकास अधिकारी तुरकर हे नळ देण्यास तयार नाही व त्यांच्या घराजवळून पुढील विज वितरण कंपनीला पाणी देत आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या नंतर कुणालाही पाणी द्या. असा सूर गावकऱ्यांचा आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत कामात अनेक प्रकारचे गैरव्यवहार झाले. ही माहितीे माहितीच्या अधिकारातून मिळाली. संबंधीत कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून येथील नागरिकांना न्याय देण्यात यावे, अशी तक्रारकर्त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)