शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात शासकीय धान खरेदीत अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 11:05 IST

शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीत बरेच गौडबंगाल असून या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि खासगी व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याची ओरड मागील दोन तीन वर्षांपासून सुरू होती.

ठळक मुद्दे सातबारावरील नोंदी पेक्षा अधिक खरेदी लोकमतने केला होता पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी सुरू करुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र यंदा हमीभाव अधिक असल्याने काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे सातबारा गोळा करुन त्यावर आपल्या धानाची विक्री केली. हा प्रकार लोकमतने उघकीस आणल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान चौकशीत सातबारावरील नोंदी पेक्षा अधिक प्रमाणात धान खरेदी झाल्याची बाब पुढे आली आहे. लवकरच हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार असून त्यानंतर संबंधितावर कारवाई केली जाणार आहे.

शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीत बरेच गौडबंगाल असून या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि खासगी व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याची ओरड मागील दोन तीन वर्षांपासून सुरू होती. त्यातच मागील वर्षी धानाला हमीभाव आणि बोनस मिळून जवळपास २५२० रुपये प्रती क्विंटल हमीभाव मिळाला. प्रथमच ऐवढा हमीभाव मिळाल्याने काही व्यापाºयांनी खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना हाताशी घेवून आपल्या धानाची विक्री केली. तसेच हा प्रकार लक्षात येवू नये यासाठी शेतकऱ्यांचे सातबारा जमा करुन आणि त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नावावर धान विक्री केला. त्यामुळेच यंदा दोन्ही हंगामात विक्रमी धान खरेदी झाली आहे. यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीला शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली.त्यामुळे याचा सुध्दा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनाच अधिक झाला. ही बाब लोकमतने यावर वृत्तमालिका चालवून उघडकीस आणली. त्यानंतर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सर्व शासकीय धान खरेदी केंद्रावरील सातबारा आणि खरेदीची चौकशी करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले होते. त्यांनी नुकतीच याची चौकशी करुन आपला अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी वानखेडे यांच्याकडे सादर केला आहे. या चौकशीत बऱ्याच धान खरेदी केंद्रावर सातबारा नोंदी वाढवून आणि नोंदी पेक्षा अधिक धान खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात जिल्ह्यातील बऱ्याच धान खरेदी करणाऱ्या बऱ्याच सेवा सहकारी संस्था अडकण्याची शक्यता आहे. लवकरच हा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वानखेडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

तलाठी आणि केंद्रावरील कर्मचारी येणार अडचणीतलागवड ऊसाची आणि नोंद धानाची असा प्रकार बऱ्याच सातबाऱ्यावर तलाठ्यांना हाताशी घेवून करण्यात आला होता. काही व्यापाऱ्यांनी यासाठी शेतकऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे सातबारा गोळा करुन त्यावरील हेक्टर क्षेत्रात सुध्दा वाढ केल्याची बाब पुढे आली होती. दरम्यान उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी केलेल्या चौकशीत ही बाब सिध्द झाली आहे. त्यामुळे तलाठी आणि शासकीय धान खरेदी केंद्रावरील कर्मचारी सुध्दा यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

लवकरच होणार कारवाईशासकीय धान खरेदी केंद्रावर बरेच गौडबंगाल असून लोकमतने याचा सातत्याने पाठपुरावा करुन हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. तसेच खरेदी केंद्रावरील सातबाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता याची चौकशी पूर्ण झाली असून लवकरच हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करुन संबंधित कर्मचारी आणि संस्थावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :agricultureशेती