शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदमध्ये निघतात प्रतिनियुक्तीचे नियमबाह्य आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या हव्यासापोटी एका खासगी कंपनीच्या विम्यात टाकावी लागली.

ठळक मुद्देहात ओले झाल्याची चर्चा : पदोन्नती होताच प्रतिनियुक्तीवर बोलाविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आयएसओचे स्वप्न पाहणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे ढिसाळ झाला आहे. मिनी मंत्रालयात काम करणारे अधिकारी आपल्या सोयीनुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती व सोयीनुसार प्रतिनियुक्ती देत असल्याचे प्रकार उघडकी येत आहे. वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यात आली. परंतु लगेच त्याला पुन्हा प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या हव्यासापोटी एका खासगी कंपनीच्या विम्यात टाकावी लागली. तरीही त्या कर्मचाऱ्यावर माध्यमिक शिक्षण विभागाची नजर जात नाही. माध्यमिक शिक्षण विभागाचा मोह न सोडणाºया या कर्मचाऱ्याची पदोन्नती आमगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून झाली.मात्र तेथे एकही दिवस नोकरी न करता राजकीय दबाव आणून आणि शस्त्रक्रिया झाल्याचे कारण देत अनुकंपा तत्वावर लागलेला एक कर्मचारी माध्यमिक विभागातील एका विशिष्ट टेबलाशिवाय दुसºया कुठल्याच कार्यालयात जिथे बदली झाली तिथे काम केल्याचे दिसून येत नाही. त्यावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कसे मेहरबान आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातही कार्यालयातून कार्यमुक्त न होता सरळ रूजू झालेल्या त्या कर्मचाºयाला आमगावचे खंडविकास अधिकाºयांची मुकसंमती आहे का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तो कर्मचारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक पदावर असताना काय केले हे त्या विभागातील सर्वांनाच नव्हे तर खासगी माध्यमिक शाळांमधील सर्वच मुख्याध्यापक व शिक्षकांना ठाऊक आहे. जिल्हा परिषदेच्या सन २०१९ मध्ये झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये त्या कर्मचाºयाची देवरी येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात बदली झाली. मात्र तो तिथेही थांबला नाही. त्याने तिथून प्रतिनियुक्तीसाठी राजकीय व प्रशासकीय दबाव तंत्राचा वापर करु न घेतला. २८ मे २०१९ रोजी बदली झालेला व्यक्ती देवरीला ६ जून रोजी रूजू होते.या काळात खूप आटापिटा केला आणि आपली बदली रद्द व्हावी म्हणून कसरत केली. परंतु यश न आल्याने शेवटी ११ सप्टेंबर २०१९ रोजी प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत परत आणण्यात आले.दरम्यानच्या काळात हा कर्मचारी कधीही देवरीतील कार्यालयात वेळेवर पोचला नाही. अशा कर्मचाऱ्याला आता पदोन्नती मिळाली. पदोन्नतीमध्ये आमगाव पंचायत समिती मिळाली असली तरी आपली प्रतिनियुक्ती गोंदियात करून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक