विदेशातून परतलेल्या १७ जणांची जिल्ह्यात तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:34+5:30
विदेशात असलेले १७ जण गोंदिया जिल्ह्यात परतले.त्यात गोंदियात १२, तिरोडा तालुक्यात परतलेले २, देवरी, आमगाव व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यात प्रत्येक एक व्यक्ती विदेशातून परतले आहेत. या १७ लोकांची तपासणी करण्यात आली. परंतु कोरोनाचे लक्षणे आहे का याची तपासणी केली असता आतापर्यंत दोघांनाच काही प्रमाणात लक्षणे दिसून आली.

विदेशातून परतलेल्या १७ जणांची जिल्ह्यात तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जगात कोरोना व्हायरसची दहशत असताना विदेशात राहत असलेले १७ जण गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले. त्या १७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बाहेरील देशातून देशात येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. जगभरात कोरोनाची दहशत आहे.
विदेशात असलेले १७ जण गोंदिया जिल्ह्यात परतले.त्यात गोंदियात १२, तिरोडा तालुक्यात परतलेले २, देवरी, आमगाव व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यात प्रत्येक एक व्यक्ती विदेशातून परतले आहेत. या १७ लोकांची तपासणी करण्यात आली. परंतु कोरोनाचे लक्षणे आहे का याची तपासणी केली असता आतापर्यंत दोघांनाच काही प्रमाणात लक्षणे दिसून आली. त्यात एकाने स्वत: नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रक्ताचे नमुने दिले. परंतु त्यांचाही रिर्पोट निगेटीव्ह आला.
उर्वरीत १५ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. परंतु त्यांना कोरोनाची काहीच लक्षणे न आढळल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
विलगीकरणाचे १४ दिवस झाल्याशिवाय बाहेर पडू नका
विदेशातून गोंदिया जिल्ह्यात परतलेल्या १७ लोकांनी विलगीकरणाचे १४ दिवस झाल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे त्यांना सांगण्यात आले. ते बोहर फिरताना आढळल्यास आरोग्य विभागाला माहिती द्यावी,विदेशातून आलेल्या लोकांच्या जे-जे संपर्कात आले त्यांनी स्वत:हून आपली तपासणी करून घ्यावी.
या देशातून परतलेले हे १७ लोक
गोंदिया जिल्ह्यातील पाच तालुक्यात परतलेल्या १७ लोकांपैकी पाच लोक कतार येथून परतले आहेत.अबूदाबी दोन, रशिया दोन, दुबई दोन, अमेरिका तीन, थायलंड दोन व इजिप्त येथून एक असे १७ लोक परतलेले आहेत.
सर्व नागरिकांनी सामुदायीक ठिकाणी जाण्याचे टाळावे.लग्न, मेळावे, सार्वजनिक कार्यक्रम किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, तोंडाला रूमाल बांधावा, काळजी घ्यावी. बाहेरून आलेल्या रूग्णांशी संपर्क टाळावा.
- डॉ.श्याम निमगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया.