शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय घरफोड्याला अटक

By admin | Updated: May 31, 2014 23:35 IST

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या परिसरात चोरी करणार्‍या एका आंतरराज्यीय टोळीतील सदस्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन जण फरार आहेत.

गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या परिसरात चोरी करणार्‍या एका आंतरराज्यीय टोळीतील सदस्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन जण फरार आहेत.गोंदिया जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण नावडकर व त्यांचे सहकारी जिल्ह्यात घरफोडीच्या जुन्या आरोपींना तपासण्यासाठी गस्त घालत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनीे आरोपी समीर ऊर्फ पालो उर्फ राकेशसिंग ऊर्फ छोटू बंगाली वल्द जमाल शेख (२९) रा.मासुरकर चौक, गंगाजमूना इतवारी नागपूर हा नेहरू चौक गोंदिया येथे संशयास्पद स्थितीत फिरताना मिळाला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने २४ एप्रिल २0१४ रोजी आपला सहकारी सायफुन शेख (२८) रा.हापुर, गलघडा, (पश्‍चिम बंगाल) याच्याबरोबर हड्डीटोली रोड, रामनगर गोंदिया येथे चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरीतील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम सायफुन शेख याने घेतल्याचे सांगितले. सदर घटनेपासून त्याच्याकडील फोन बंद ठेवून पळून गेल्याचे सांगितले. सदर मालाबाबत ताब्यात घेतलेल्या आरोपीने चोरीतील काही चांदीचे दागिणे हे मासूद अफजल खान (३५) रा. संजय नगर वॉर्ड, रा. रायपूर (छ.ग.) याला दिल्याचे सांगितले. मकसूद हा सदर चांदीचे दागिने घेवून पळाल्याचे सांगितले. सदर आरोपी हे जिल्हा रायपूर, जिल्हा राजनांदगाव, भिलाई (छ.ग.) नागपूर शहर येथील घरफोडीचे सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील २ आरोपी हे परराज्यात फरार झाले आहेत. सदर कारवाई भांडारकर, नावडकर यांच्यासह स.फौजदार नवखरे, पोलीस हवालदार शंकर साठवणे, अर्जुन कावळे, रामलाल सार्वे, अण्णा ब्राम्हणकर, संतोष काळे, अजय सव्वालाखे, धनंजय शेंडे, भुवनलाल देशमुख, तुलसीदास लुटे, रेखलाल गौतम, राजकुमार खोटेले, नितीन जाधव, दीक्षित दमाहे, विनय शेंडे, अशोक कापसे, सयाम यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)