झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दुधात भेसळ सुरूच

By Admin | Updated: November 2, 2014 22:38 IST2014-11-02T22:38:12+5:302014-11-02T22:38:12+5:30

दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील अत्यंत आवश्यक पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवातदेखील दुधापासून तयार झालेल्या चहानेच होते. मात्र दूध विक्रेते कमीत कमी

In the instant of getting rich, milk adulteration continues | झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दुधात भेसळ सुरूच

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दुधात भेसळ सुरूच

गोंदिया : दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील अत्यंत आवश्यक पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवातदेखील दुधापासून तयार झालेल्या चहानेच होते. मात्र दूध विक्रेते कमीत कमी वेळात अल्पसा श्रम करून लवकरात लवकर श्रीमंत कसे होता येईल यासाठी सतत धडपड करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
दुधात भेसळ करून अधिकचा नफा मिळविण्याचा बेतात आपणच आपल्या जवळील असलेल्या लोकांच्या जीवनाशी खेळ करीत आहोत, ही बाब कदाचित विसरली जात आहे. प्रत्येकांची दैनंदिन गरज असलेल्या दुधामध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक द्रव्यांची भेसळ केली जात असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग अशा भेसळखोरांवर कठोर कारवाई करीत नसल्याने दुधात भेसळ करण्याच्या गोरखधंदा परिसरात फोफावाला आहे.
दूध लहान चिमुकल्या मुलाबाळांसाठी अमृत समझला जातो. डॉक्टरही आजारी रुग्णांना दूध पिण्याचा सल्ला देतात. दुधामध्ये असलेले भरपूर प्रथिने मानवी आरोग्याकरिता लाभदायक असले तरी हिंदु संस्कृतीप्रमाणे दुधाला एक पवित्र द्रव्य म्हणून दुधाचा उपयोग होमहवन, पूजापाठ यात केला जातो. मात्र सध्या बाजारात विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या दुधाच्या शुध्दीकरणावर भेसळखोरीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बऱ्याच दूध व्यवसायिकांनी दुधामध्ये भेसळ करून त्या दुधाची राजरोसपणे विक्री करण्याला आपला व्यवसाय केला आहे. हा व्यवसाय करताना आपण आपल्याच लोकांचा जीवाशी खेळ करीत असल्याची बाब ते विसरले आहेत. पूर्वी मद्य विक्रीत होणारी भेसळ सर्वांनाच ठाऊक होती. मात्र आता मद्यात भेसळीचे प्रमाण कमी होऊन दुधात कितीतरी पटीने भेसळीचे कळस गाठले आहे. सदर दूध विक्रेते सॉकरीन माल्टवेट पावडर, कपडे धुण्याचा सोडा, शॅम्पू, फोटो धुण्याचे रसायन, साखर, वनस्पती, तेल, युरिया आदी रसायनांचा वापर करून दुधाला विषात रुपांतर करण्याचा प्रकार परिसरात जोमात सुरू आहे. काही दूध विक्रेते तर चक्क रासायनिक पध्दतीने दुधाची निर्मिती करीत असल्याची चर्चाही होताना दिसून येत आहे. हे रासायनिक दूध शुध्द दुधासारखे दिसते. त्याची चवदेखील नैसर्गिक दुधासारखीच असते. त्यामुळे कुणीही सदर दूध भेसळयुक्त असल्याची कल्पनाही करू शकत नाही. अशा दूध विक्रीतून विक्रेते कमी परिश्रम करून जास्तीत-जास्त नफा कमवित आहेत. भेसळ करण्याकरिता लागणारे रासायनिक द्रव्यही बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ केली जाते. हा प्रकार तालुक्यात बिनधास्तपणे सुरू आहे. बऱ्याच महिन्यांपासून एकही दूध विक्रेत्यावर कारवाई झाली, असे ऐकीवात नाही. त्यामुळे भेसळखोरांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. आपण दूध सेवन करीत नसून जहरच सेवन करीत आहोत, याची थोडीसी कल्पनाही सर्वसामान्य लोकांना नसते. म्हणूनच हा व्यवसाय राजरोसपणे तालुक्यात जोमाने सुरू आहे. संबंधित विभागाने त्वरीत लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the instant of getting rich, milk adulteration continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.