फिडर कॅनलच्या बांधकामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:54 IST2017-10-09T20:54:08+5:302017-10-09T20:54:33+5:30

गोंदिया तालुक्यातील दतोरा येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या फिडर कॅनलच्या बांधकामाची पाहणी जिल्हाधिकारी अभिमन्य काळे यांनी नुकतीच केली.

Inspection of the construction of feeder canal | फिडर कॅनलच्या बांधकामाची पाहणी

फिडर कॅनलच्या बांधकामाची पाहणी

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : जिल्हाधिकाºयांसह अनेक अधिकाºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील दतोरा येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या फिडर कॅनलच्या बांधकामाची पाहणी जिल्हाधिकारी अभिमन्य काळे यांनी नुकतीच केली. त्यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, उपविभागीय अभियंता चौधरी, शाखा अभियंता वासुदेव रामटेककर प्रामुख्याने उपस्थित होते.
सन २०१६-१७ मध्ये सदर काम जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आले. गावापासून १ किमी अंतरावर असलेल्या तलावाचे पाणी हे गावालगत असलेल्या मामा तलावात सोडण्यात आले. त्यामुळे या तलावातील सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली. गावातील पाण्याचे स्त्रोत बळकट होण्यास मदत झाली. नवीन तलाव ते गाव तलावापर्यंत ५३५ मीटर लांबीचा खुला कालवा आणि १६५ मीटर लांब भूमिगत पाईप लाईन टाकण्यात आली. त्यामुळे गावाजवळच्या तलावात मोठ्या प्रमाणात जलसंचय होण्यास मदत झाली.
जलयुक्त शिवार अभियानातून हे नाविन्यपूर्ण काम झाल्यामुळे माजी सरपंच धनलाल कावळे, सूरजलाल महारवाडे, सुरेश मेंढे, मेघराज महारवाडे, दिनेश उके व ग्रामस्थांनी शासनाचे आभार मानले.

Web Title: Inspection of the construction of feeder canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.