शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांच्या गैरकृत्याची चौकशी थंडबस्त्यात

By admin | Updated: October 28, 2015 02:12 IST

गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षानी केलेल्या गैरकृत्याची चौकशी अद्याप करण्यात आली नाही.

रावणवाडी : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षानी केलेल्या गैरकृत्याची चौकशी अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीची जिरवाजिरव होत असल्याचा आरोप केला आहे. प्राप्त माहितीनुसार, शासनाने गरीब, निराधार, बेघर व गरजू नागरिकांना सन्मानाचे जीवन जगण्याकरिता राज्यात इंदिरा आवास व रमाई घरकुल योजना मागील बऱ्याच काळापासून सुरू केली आहे. त्यानिमित्त शासन या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करुन बेघराला विनामुल्य घर उपलब्ध करवून दिले जात आहे. परंतु शासनाच्या नियम व कायद्यांची पायमल्ली करुन ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्त समिती अध्यक्षाने गावातील काही निरक्षरांच्या अज्ञानतेचा फायदा घेतला. य महाभागांनी काही व्यक्तींना घरकुल मंजुर करवून देण्याचे खोटे आमिष देऊन प्रत्येकी दोन हजार रुपये बेकायदेशीर घेऊन फसवणूक केली. याबाबतची तक्रार संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई करिता देण्यात आली होती. मात्र अद्याप कारवाई करण्यात आली नसल्यामुळे शासनाप्रती या नागरिकात रोष निर्मण झाला आहे. तक्रार करुन बरेच दिवस लोटूनही त्या ग्राम पंचायत सदस्य व तंटामुक्त समिती अध्यक्षावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे न्याय मागावा तर कोठून अशा प्रश्न लूबाडणूक झालेल्या व्यक्तींकडून करण्यात येत आहे.पीडित तक्रारकर्त्यांनी घडलेल्या पूर्ण गैरकृत्याची रितसर लेखी तक्रार संबंधित कार्यपालन अधिकारी, खंडविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक यांना कारवाई करण्याकरिता दिली. मात्र बरेच दिवस होऊनही अद्याप कसलीच कारवाई अजूनपर्यंत झाली नाही. त्यामुळे तक्रारीची जिरवाजिरव झाल्याचा आरोप आता तक्रारकर्ते करीत आहेत.(वार्ताहर)