गोंदियात भारत बटालियनच्या पोलिस जवानाने केला तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 09:50 IST2017-12-18T09:48:35+5:302017-12-18T09:50:26+5:30

नक्षल बिमोडासाठी तयार करण्यात आलेल्या भारत बटालियनच्या पोलीस जवानाने प्रेमाच्या भूलथापा देऊन तब्बल एक वर्ष तरुणीवर अत्याचार केला.

Indian battalion police force in Gondia tortured the girl | गोंदियात भारत बटालियनच्या पोलिस जवानाने केला तरुणीवर अत्याचार

गोंदियात भारत बटालियनच्या पोलिस जवानाने केला तरुणीवर अत्याचार

ठळक मुद्देप्रेमाच्या भूलथापा देऊन फसवले

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : नक्षल बिमोडासाठी तयार करण्यात आलेल्या भारत बटालियनच्या पोलीस जवानाने प्रेमाच्या भूलथापा देऊन तब्बल एक वर्ष तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणाची वाच्यता कुणाकडे केली तर तुला ठार करील अशी धमकी तरूणीला दिली. सदर अत्याचारी पोलीस जवानाला गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या भारत बटालियनमध्ये गोरेगाव तालुक्याच्या आसलपाणी येथील राजुकमार आसाराम शहारे (३१) याचा समावेश आहे. त्याने कारंजा येथील ३० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले व लग्नाचे आमिष देऊन आॅक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या दरम्यान तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरूणीने लग्नाची मागणी केली असता राजकुमारने तिला लग्नास नकार देत यासंबंधाची माहिती कुणाला दिली तर तुला ठार करीन अशी धमकी देत होता.
नाईलाजास्तव तरुणीला पोलिसांत धाव घ्यावी लागली. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी राजकुमार शहारे याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ४१७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या नागपूरच्या भारत बटालियन कॅम्पमध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी त्याला शनिवारी सायंकाळी ६ वाजता अटक करुन रविवारी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले आहे.

Web Title: Indian battalion police force in Gondia tortured the girl

टॅग्स :Policeपोलिस