शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे वाढले अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

हा मार्ग खडबडीत असल्यामुळे मार्गावर प्रत्येक वाहनाची वाहतूक संथ गतीने व्हायची. मात्र या मार्गाचे नव्याने डांबरीकरण झाल्यामुळे गुळगुळीत रस्त्यावर जड वाहनेही सुसाट धावत आहेत. त्यामुळे आजघडीला रस्ता ओलांडून जाणे फार कठिण झाले आहे. अपघातही वाढले असून ठिकठिकाणी संबंधित विभागाने गतिरोधक बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्देमार्गदर्शनाची गरज : ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : दोन राज्यातील दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या गोंदिया-बालाघाट राज्य मार्गावर सतत लहानमोठ्या वाहनांची अहोरात्र वर्दळच असते. पूर्वी हा मार्ग खडबडीत असल्यामुळे मार्गावर प्रत्येक वाहनाची वाहतूक संथ गतीने व्हायची. मात्र या मार्गाचे नव्याने डांबरीकरण झाल्यामुळे गुळगुळीत रस्त्यावर जड वाहनेही सुसाट धावत आहेत. त्यामुळे आजघडीला रस्ता ओलांडून जाणे फार कठिण झाले आहे. अपघातही वाढले असून ठिकठिकाणी संबंधित विभागाने गतिरोधक बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.गोंदिया-बालाघाट राज्य मार्गावर रावणवाडी पोलीस ठाण्यासमोर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. ५० मीटर समोर अंतरावर जि.प. प्राथमिक शाळा आहे. या शाळेला लागूनच मुख्य बस थांबा आहे. या बस थांब्यावरुन पूर्वेस बिरसी हवाई पट्टीला जोडणारा मुख्य मार्ग आहे. पश्चिम दिशेला दासगाव परिसरात जाणारा मुख्य डांबरी मार्ग आहे. मुख्य बस थांबा चहूमार्गांनी जोडला आहे. याच मार्गावर १०० मीटर अंतरावर चारगाव, सिरपूर व मोगर्रा जाणारा मुख्य डांबरी मार्ग आहे. या मार्गावरही लहानमोठ्या वाहनांची सतत रेलचेलच असते. या मार्गावरुन येणारे वाहन सरळ मुख्य मार्गावर येत असल्यामुळे हा जोड रस्ता अपघात होण्याचा मुख्य पॉर्इंट बनलेला आहे.या ठिकाणी अनेकदा लहानमोठ्या अपघाताच्या घटना घडून अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. हा मार्ग गावाच्या मध्यभागातून असल्यामुळे मार्ग ओलांडून जाणे मुलाबाळांना कठीण झाले आहे. रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी या राज्य मार्गावर तातडीने गतीरोधक लावण्यात यावे, अशी मागणी ग्रामीण नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा