शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाने उन्हाळी लागवड क्षेत्रात वाढ

By admin | Updated: January 30, 2016 02:08 IST

भूगर्भातील जलस्तर व पिकांचे सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने राज्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यातील रबी पिकांचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येते.

१,५७३ हेक्टर क्षेत्र वाढले : चार तालुक्यांत मात्र लागवड क्षेत्रात घटदेवानंद शहारे  गोंदियाभूगर्भातील जलस्तर व पिकांचे सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने राज्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यातील रबी पिकांचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येते. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे बांधांमध्ये पाणी कमी आहे. परंतु जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांतून मोठाच लाभ झाला आहे. यावर्षी जिल्ह्यात रबी पिकांची लागवड सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा एक हजार ५७३ हेक्टर अधिक क्षेत्रात करण्यात आली आहे.जिल्ह्यात रबीचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ६५० हेक्टर आहे. मात्र यावर्षी २८ हजार २२३ हेक्टरमध्ये पिकांची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे २८ हजार ०४० हेक्टरमध्ये रबीची लागवड करण्यात आली होती. जिल्ह्यात डाळवर्गीय पिकांची लागवड सर्वाधिक झाली आहे. डाळीचे सर्वसाधारण क्षेत्र १४ हजार ८१० हेक्टर असताना यावर्षी २० हजार २५६.४० (१३६ टक्के) हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. रबी तृणधान्याचे क्षेत्र मात्र घटले आहे. सर्वसाधारण क्षेत्र २ हजार ९२० हेक्टर असताना १ हजार ९१६.२० (६५.६ टक्के) हेक्टरमध्येच लागवड करण्यात आली आहे. मका १९९ व इतर तृणधान्यांची ६ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. गहू, मका, हरभरा व इतर पिकांचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच लाख-लाखोळी, जवस, इतर तेलवर्गीय व भाजीपाला पिकांचे क्षेत्र घटले आहे.तिरोडा तालुक्यात सर्वाधिक रबी पीकगोंदिया तालुक्यात रबीच्या सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा दुप्पट म्हणजे ४,०५१ हेक्टर आणि अर्जुनी-मोरगाव येथे ४,२१४ हेक्टरमध्ये रबी पिकांची लागवड करण्यात आली आहे. देवरी तालुक्यात १,५१४ हेक्टरमध्ये पिकांची लागवड झाली आहे. रबीची सर्वाधिक लागवड तिरोडा तालुक्यात करण्यात आली आहे. तिरोडा तालुक्यात ८,२३३ हेक्टरमध्ये उन्हाळी धानासह इतर पिक घेतले जात आहे. मात्र आमगाव, गोरेगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी येथे रबी हंगामाच्या सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी लागवड करण्यात आली आहे.