शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकर शेतीत घेतले चार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

वाघनदीच्या किनाऱ्यावर वसलेले नवेगाव हे गाव चवदार वांगी व इतर भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील निम्मे लोक नदी लगत जमिनीवर भाजीपाला उत्पादन घेवून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु नोहरलाल दमाहे नदीच्या किनाऱ्यावर भाजीपाला पिकाची लागवड करण्याऐवजी धानपिक घेण्याच्या शेतीत वांगी उत्पादन घेवून सर्वांना आश्चर्य चकीत केलेले आहे.

ठळक मुद्देयशस्वी प्रयोग : कोरोना काळात दिला अनेकांना रोजगार, शेतकऱ्यांसमोर आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : काही करण्याची जिद्द व चिकाटी असेल तर वयाची किंवा परिस्थिती बाधा आडवी येत नाही. हे सिद्ध करुन दाखविले आहे नवेगाव येथील ७० वर्षीय शेतकरी नोहरलाल पंचम दमाहे यांनी. त्यांनी दीड एकर शेतीत चार लाख रुपयांचे वांगी पिकाचे उत्पादन घेतले आहे.वाघनदीच्या किनाऱ्यावर वसलेले नवेगाव हे गाव चवदार वांगी व इतर भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील निम्मे लोक नदी लगत जमिनीवर भाजीपाला उत्पादन घेवून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु नोहरलाल दमाहे नदीच्या किनाऱ्यावर भाजीपाला पिकाची लागवड करण्याऐवजी धानपिक घेण्याच्या शेतीत वांगी उत्पादन घेवून सर्वांना आश्चर्य चकीत केलेले आहे. धानपिक घेण्यासंबंधी गुणाकार भागाकार केला तर दीड एकर शेतीत धान उत्पादनातून जेमतेम ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. त्यातच ३० हजार रुपायपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त लागवड खर्च येतो. त्यावर शेतकरी कुटुंबाने केलेल्या मेहनतीचा विचार केला तर हातात काहीच उरत नाही.या दृष्ट चक्रातून बाहेर निघण्याचा विचार करुन नोहरलाल दमाहे यांनी दीड एकर जमिनीत वांगी उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. प्रतिकुल वातावरण बघता अनेक वेळा असे वाटायचे की वांगी उत्पादनासाठी केलेली पैशाची गुंतवणूक जोखीमेची तर ठरणार नाही. परंतु दमाहे परिवाराची जीवापाड मेहनत वांगण्याच्या प्रत्येक झाडाची निगा राखणे, वेळेवर पाणी देणे, खत देणे, किटकनाशकाचा वापर करणे, यात कुठेही कमी पडू न देण्याचा निर्धार यामुळे प्रतिकुल वातावरणात सुद्धा वांगी उत्पादन वाढविले. ढगाळ वातावरणाचा फटका बसत मोठ्या प्रमाणावर वांग्यांना किडीचा प्रादुर्भाव सुद्धा झाला. परंतु यामुळे दमाहे कुटुंबीय क्वचित ही खचले नाही. आपल्या कुटुंबातील चार पाच लोक व इतर चार पाच लोक मिळून जवळपास दहा लोक सतत परिश्रम घेत असतात. यात काही झाडांची निगा करण्यात काही लोक वांगी तोडण्यात तर काही लोक विक्री करण्यात व्यस्त असतात.लॉकडाऊनचा फटकाकोरोनामुळे आठवडी बाजार बंद पडले आहेत. त्यामुळे वांग्याची मागणी मोठ्या प्रमाणात नाही. लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम रद्द झाले असल्याने फार मोठ्या प्रमाणात वांग्यांची मागणी नाही. कोरोना काळात गावा-गावात फेरीवाले भाजीपाला विक्री करीत आहे. असे फेरीवाले आपल्या क्षमतेनुसार वाडीवर येवून वांगी खरेदी करतात. तरी सुद्धा वांगी उत्पादन करणे, धानाच्या उत्पादनापेक्षा जास्त फायदेशीर आहे. हे दमाहे परिवाराने सिद्ध करुन दाखविले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती