रिलायन्स हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:08 IST2018-12-22T01:06:41+5:302018-12-22T01:08:04+5:30

कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय व मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोंदिया येथे कारंजा परिसरात रिलायन्सचे कॅन्सर केयर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

The inauguration of the RIL Hospital on Sunday | रिलायन्स हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी

रिलायन्स हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी

ठळक मुद्देशरद पवार, प्रफुल्ल पटेल, टिना अंबानी यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय व मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोंदिया येथे कारंजा परिसरात रिलायन्सचे कॅन्सर केयर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, पालकमंत्री राजकुमार बडोले, टिना अंबानी, खा. मधुकर कुकडे, आ. गोपालदास अग्रवाल, आ.परिणय फुके, आ.विजय रहांगडाले, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, मनोहरभाई पटेल अडॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल व माजी आ. राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत. सदर रूग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जीत आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना नागपुर व मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची पायपीट सुध्दा कमी होणार आहे. या रुग्णालयाची गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील रुग्णांना सुध्दा मदत होणार आहे.

Web Title: The inauguration of the RIL Hospital on Sunday