नवनिर्मित इमारतीचे उद्घाटन

By Admin | Updated: March 15, 2017 01:08 IST2017-03-15T01:08:31+5:302017-03-15T01:08:31+5:30

विद्यार्थी जीवन हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सोनेरी काळ आहे. जीवनात कायमस्वरूपी यशस्वी

The inauguration of the newly constructed building | नवनिर्मित इमारतीचे उद्घाटन

नवनिर्मित इमारतीचे उद्घाटन

बहेकार यांचा सत्कार : ३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप
सालेकसा : विद्यार्थी जीवन हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सोनेरी काळ आहे. जीवनात कायमस्वरूपी यशस्वी बनून जगायचे असेल तर विद्यार्थी काळात प्राप्त होणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ घेत संधीचे सोने केले पाहिजे, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षाबेन पटेल यांनी केले. त्या सालेकसा येथे मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या नवनिर्मित इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या.
इमारतीचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा वर्षाबेन पटेल, अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्या दुर्गा तिराले, प्रभाकर दोनोडे, आमगाव खुर्दचे सरपंच योगेश राऊत, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य हरिनारायण चौरसिया, नवीनभाई पटेल, विजय रगडे, सातपुते व प्राचार्य डॉ.ललीत जीवानी उपस्थित होते.
वर्षा पटेल पुढे म्हणाल्या, वाढती विद्यार्थी संख्या व सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा जवाबदारी कडे वळावे लागते. विशेष करून मुलींना घरगृहस्ती मध्ये जवाबदारी संभाळावी लागते. शिक्षण घेत असताना आपल्या क्षमतेचा व बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करून घेणे आवश्यक असते. त्यामुळे आयुष्यात अनेक आवाहने पेलण्याची धैर्य वाढते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरतभाऊ बहेकार होते. ते म्हणाले की, सालेकसा तालुका हा आदिवासी नक्षलग्रस्त व मागासलेला असून या तालुक्याचे मुली व मुले शिक्षणाच्या सोयी अभावी आपले शिक्षण अर्धवट सोडतात. २२ वर्षा पूर्वी त्यानी केलेल्या प्रयत्नामुळे प्रफुल्ल पटेल यांनी येथे पदवी महाविद्यालय सुरू करून उच्च शिक्षणाची दारे उघडून दिली. येथे विज्ञान शाखा पुन्हा सुरू करण्याचा आग्रह केला. कार्यक्रमाला पुरविण्यासाठी विस्तारीत स्वरूपात पुन्हा नवीन इमारत जोडण्यात आल्याचे म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करण्यात व दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. दुर्गा तिराले, प्रभाकर दोनोडे यांनी संबोधित केले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.ललीत जीवानी यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य हरिनारायण चौरसिया यांनी महाविद्यालयाच्या प्रगती बाबत अनेक प्रसंगाचा उलगडा केला. माजी मंत्री भरत बहेकार यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. प्राध्यापकांनी सुरू केलेली मेरिट स्कॉलरशीपचे ३० धनादेश पात्र विद्यार्थ्यांना देण्यात आले. संचालन प्रा.श्रीकांत भोवते तर आभार प्रा.गोपाल हलमारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The inauguration of the newly constructed building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.