खुनाचा प्रयत्न करणाऱ्या इम्रानची तुरुंगात रवानगी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:33 AM2021-09-23T04:33:00+5:302021-09-23T04:33:00+5:30

संतोषने आरोपी इम्रान ऊर्फ गुरू सुभान शेख (२४), रा. गांधी वॉर्ड, गोंदिया याला घर खाली कर असे म्हटले असता ...

Imran jailed for attempted murder () | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या इम्रानची तुरुंगात रवानगी ()

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या इम्रानची तुरुंगात रवानगी ()

Next

संतोषने आरोपी इम्रान ऊर्फ गुरू सुभान शेख (२४), रा. गांधी वॉर्ड, गोंदिया याला घर खाली कर असे म्हटले असता आरोपीने त्याचा राग मनात धरून संतोषच्या गळ्यावर दोन ते तीन वेळा ब्लेडने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या उषा नथ्थूलाल गुप्ता (४९) यांनाही धक्का देऊन ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणातील आरोपीविरोधात गोंदिया शहर पोलिसांनी भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला त्याच दिवशी सहायक पोलीस निरीक्षक होंडे व पोलीस शिपाई अनिल कोरे यांनी अटक केली होती. न्यायालयाने आरोपी इम्रानला २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी (दि.२२) जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

Web Title: Imran jailed for attempted murder ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.