शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेश मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत

By admin | Updated: October 22, 2014 23:20 IST

राज्य परिवहन महामंडळ आगार आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बालाघाट मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत आला आहे. दोन्ही विभागांनी आपले खिसे भरण्याकरिता जाणूनबजून

गोंदिया : राज्य परिवहन महामंडळ आगार आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बालाघाट मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत आला आहे. दोन्ही विभागांनी आपले खिसे भरण्याकरिता जाणूनबजून दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवासी करू लागले आहेत.गोंदिया आगारातून बालाघाट, मलाजखंड, वाराशिवणी, लालबर्रा, रजेगाव यासह अन्य ठिकाणीही लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू आहेत. परंतु जिल्ह्यातील परवाने नसलेल्या प्रवासी वाहतुकीकडे एसटी आगार व प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष आहे. परिणामी विनापरवाना वाहनांत प्रवाशांना प्रवास करणे भाग पडत आहे.एस.टी. आगारातून १०० मिटरपर्यंत अवैध वाहने उभी न करण्याचा नियम आहे तसेच सूचना फलकही लावण्यात आले होते. मात्र अवैध प्रवासी वाहने या नियमाला केराची टोपली दाखवीत एसटी आगारातून प्रवाशांची पळवापळवी करतात. याकडे वाहतूक पोलिसांचे नेहमीच दुर्लक्ष असते.अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांचा गोंदियातील वाहतुकीचे स्थळ जयस्तंभ, कुडवा नाका, मरारटोली आहे. मुख्य एसटी थांब्याजवळ तर चक्क सहाचाकी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची दिवसरात्र रेलचेल असते. वाहनांवर कारवाई करण्याकरिता प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसांनी संबनधीत विभागाने नियुक्ती केली; पण ते केवळ बुजगावणे ठरले आहेत. जिल्ह्यात अनेक बेरोजगारांनी बँकेतून कर्ज काढून वाहने खरेदी केली. या बेरोजगारांप्रति सहानुभूती दाखविण्याच्या नावाखाली व्यवसायास पोलिसांकडून परवानगी दिली जाते. परंतु ही परवानगी मोफत नसते. वाहतूक पोलिसांनी ‘अर्थ’ पूर्ण व्यवहार आणि वाहनांच्या देखभाल दुरुस्तीवर बराच खर्च होत असल्यामुळे या अवैध वाहतुकदारांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. प्रवासी मिळविण्यावरुन अनेकदा वाहनधारकांमध्ये हाणामारीचे प्रकारहसी घडले आहेत. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. विभागाच्या तोट्याकडे दुर्लक्ष करून अधिकारी आणि कर्मचारी आपले खिसे गरम करण्यात लागले असल्याचा आरोप प्रवासी करू लागले आहेत. (प्रतिनिधी)