शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

सात रेती घाटांवरुन रेतीची अवैध तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करुन त्याची वाहतूक केली जात आहे. या रेती घाटांवरुन रेती भरलेल्या ट्रक, टॅक्टरची सरार्सपणे वाहतूक सुरू असून रेती माफियांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी अद्याप मिळाली नसल्याने रेती घाटांचे लिलाव झालेले नाही.

ठळक मुद्देमहसूल विभागाची डोळेझाक : लाखोंचा महसूल पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : गोंदिया व तिरोडा तालुक्यातील मुरदाडा, सायटोला, महालगाव, सावरा, अर्जुनी, कवलेवाडा, घाटकुरोडा या सात रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करुन त्याची वाहतूक केली जात आहे. या रेती घाटांवरुन रेती भरलेल्या ट्रक, टॅक्टरची सरार्सपणे वाहतूक सुरू असून रेती माफियांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी अद्याप मिळाली नसल्याने रेती घाटांचे लिलाव झालेले नाही. त्यामुळे रेती माफिये याचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे. गोंदिया तालुक्यातील मुरदाडा, सायटोला घाटावरुन दररोज रात्रीच्या सुमारास १० ते १५ ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक करुन त्याची तिरोडा तालुक्यात विक्री करीत आहे. महालगाववरुन गोंदिया व इतर परिसरात देवरी किन्ही घाटावरुन दासगाव, गोंदिया, तिरोडा तालुक्यातील सावरा, पिपरिया, अर्जुनी घाटावरुन परिसरात करटी बु. ते एकोडी पर्यंत आणि कवलेवाडा, घाटकुरोडावरुन तिरोडा शहरात व परिसरात ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक करुन विक्री केली जात आहे. तिरोडा तहसील कार्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कवलेवाडा घाटावरुन रेती तलाठी कार्यालय समोरुनच नेत असतात. मात्र रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रेती घाटांवरुन रेतीचा अवैध उपसा करुन त्याची वाहतूक करुन देण्यासाठी सबकुछ मॅनेज असल्याची चर्चा या परिसरात आहे. त्यामुळे दररोज रात्रीच्या सुमारास १५ ते २० ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक सुरू असताना कुठलीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाड घालून रेती माफियांचे मुस्के आवळण्याची गरज आहे.गरजू लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा करासध्या रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने घरकुल लाभार्थी खासगी बांधकाम करणारे अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे रेती माफिये याचा गैरफायदा घेत रेतीची अवैध तस्करी करुन त्याची दुप्पट दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना रॉयल्टीवर रेती उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी