शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

जन्म-मृत्यू नोंदणीला लाचेची वाळवी?

By admin | Updated: October 28, 2015 02:07 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्जदाराकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

नागरिकांना भुर्दंड : जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना लागली चटकगोंदिया : जिल्हाधिकारी कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्जदाराकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजूंना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. यात दलाल ते संबंधित कर्मचाऱ्यांचा वाटा असल्याने त्यावर कोणी बोलायला तयार नाहीत.जन्म-मृत्यू व इतर कागदपत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक वेगळा विभाग आहे. तेथे कनिष्ठ लिपिक मल्लेवार हे कारभार पाहतात. सोबत दोन कारकून व चपराशी कार्यरत आहे. मात्र ज्या कागदांसाठी ३० ते ५० रुपये लागतात तेथे ४०० ते ५०० रुपये घेतले जातात. नवेगावबांध, इटखेडा, इसापूर येथील कोल्हे व शेंडे या गरीब शेतमजूराकडून अशाच पद्धतीने पैसे उकळण्यात आले. शेंडे या गरीब मजुराकडून जन्मनोंद प्रमाणपत्रासाठी तीन प्रमाणपत्राकरीता जवळपास ११०० रुपये घेण्यात आले. यात बाहेरची एक महिला दलाल म्हणून काम करीत असल्याचे सांगण्यात येते. सदर महिला कागद लिहून देण्याचे २० रुपये घेते. रेकॉर्ड बघण्याचे २०० व इतर पैसे वेगळे वसूल केले जातात. एखाद्याकडे पैसे कमी असल्यास त्याला ‘तुझे काम होऊ शकत नाही, परत जा’ असे ठणकावून सांगितले जाते. दिवसभरात जवळपास ४० ते ५० अर्जदार येतात. प्रत्येकी ४०० घेतले तरी २० हजार रुपये वसूल होतात. यात दलाल महिलेसह कार्यरत लिपिक, चपराशी यांची साखळी आहे. प्रमाणपत्र घेणारे अर्जदार हे जिल्ह्यातून लांब अंतरावरून येतात. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी येणे शक्य नसते. याचाच गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. जन्म नोंदणी कार्यालयातील या पैशाच्या व्यवहारावर कोणाचे नियंत्रण नाही. आपल्यावर येऊ नये याकरिता दलाल महिला समोर करून गोरगरीबांकडून पैशाची वसूली होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हटवून दुसरीकडे त्यांची बदली करावी, अशी अपेक्षा पिडीत शेतकरी-शेतमजुरांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)अधिकारी जेव्हा हतबल होतातसदर प्रकाराबद्दल अन्यायग्रस्त अर्जदारांनी निवासी उपजिल्हाधिकारी लोणकर यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर टाकला. त्यांनी लगेच मल्लेवार यांना बोलावणे पाठवले असता ते पूर्व परवानगीशिवाय कार्यालयात गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यांची त्यावेळी सुटीचा अर्जही सादर केला नव्हता. त्यावर उपजिल्हाधिकारी लोणकर यांनी तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवा व त्या कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडा, असा सल्ला अर्जदाराला दिला. मात्र स्वत: त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे अधिकारीही कर्मचाऱ्यांसमोर हतबल होत असल्याचे दिसून येते.