सालेकसात कशी मिळणार आरोग्य सेवा ?
By Admin | Updated: January 24, 2015 01:12 IST2015-01-24T01:12:04+5:302015-01-24T01:12:04+5:30
सालेकसा तालुक्यातील एक लाख लोकसंख्या असलेल्या आदिवासी दुर्गम क्षेतात नागरिकांना पाहिजे असलेल्या रुग्णसेवा दुर्लक्ष झाली आहे.

सालेकसात कशी मिळणार आरोग्य सेवा ?
सालेकसा तालुक्यातील एक लाख लोकसंख्या असलेल्या आदिवासी दुर्गम क्षेतात नागरिकांना पाहिजे असलेल्या रुग्णसेवा दुर्लक्ष झाली आहे. एम ग्रामीण रुग्णालय, पाच प्राथमिक आरोग्य केंद्र तर बावीस केंद्र असुविधेअभावी नागरिकांचे आरोग्याची काळजी जोपासत आहे. विभागात ११० पदे मंजूर आहे. त्यापैकी १७ रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयात २५ खाटांची तर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल होणारे रुग्णांसाठी १० खाटांची सोय उपलब्ध आहेत. दररोज १ हजार रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. रुग्णालयात वर्षाला हजाराच्यावर प्रसुती रुग्णाची दखल घेऊन प्रसुती करण्यात येते. भौगोलीक परिस्थतीचा अवलोकन केप्यास सदर परिक्षेत्र २३ किमी अंतरापर्यंत पसरलेला आहे. आदिवासी व अतिदुर्गम क्षेत्र असून जंगल परिसराने वेढला आहे. नागरिकांना उपचाराकरीता तालुका आरोग्य केंद्रापर्यंत येण्यासाठी रस्तेमार्ग नसल्याने नागरिक नदी नाल्यांच्या प्रवाहातुन मार्ग काढत उपचाराकरीता रुग्णालयापर्यंत येतात. यासाठी रुग्णांना सलग २० किमी अंतर धोका पत्कारुन प्रवास करावा लागातो.