शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आऊटरवर तासन् तास थांबतात रेल्वेगाड्या

By admin | Updated: February 12, 2016 02:11 IST

गोंदिया रेल्वे स्थानकावर आता सात फलाट आहेत. यानंतरही लोकल रेल्वेगाड्यांना तासनतास आऊटरवर उभ्या ठेवल्या जातात. यादरम्यान प्रवाशांना अकारण त्रास होतो.

उपाययोजना थंड : प्रवाशांच्या समस्यांमध्ये होतेये सतत वाढगोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकावर आता सात फलाट आहेत. यानंतरही लोकल रेल्वेगाड्यांना तासनतास आऊटरवर उभ्या ठेवल्या जातात. यादरम्यान प्रवाशांना अकारण त्रास होतो. परंतु अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी प्रवाशांचा रोषाचा स्फोट रेल्वे अधिकाऱ्यांवर होवू शकतो.गोंदिया ते बालाघाट व बालाघाट ते गोंदिया ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या बाबत अशा घटना नेहमीच घडत असतात. बालाघाट ते गोंदिया डेमूचा वेळ गोंदियावरून ६.४५ वाजता सुटण्याचा आहे. तर गोंदियाला पोहोचण्याचा वेळ सकाळी ७.५५ वाजता आहे. ही गाडी वसंतनगरजवळ दरदिवशी ३० ते ५० मिनिटांपर्यंत उभी ठेवली जाते. त्यामुळे प्रवाशांना दुसरी गाडी पकडण्यासाठी मोठाच त्रास होतो. बालाघाटवरून लोक इतर रेल्वेगाड्या पकडण्यासाठी गोंदियाला येतात. परंतु आऊटरवर गाड्या थांबविण्यात येत असल्याने दुसऱ्या गाड्या सुटतात व प्रवाशांना अकारण तासनतास गोंदिया रेल्वे स्थानकावर थांबून रहावे लागते. मागील तीन-चार दिवसांपासून प्रवाशांच्या वतीने रेल्वे स्थानकात पोहोचून स्थानक व्यवस्थापकांचे लक्ष वेधले जात आहे. परंतु आतापर्यंत ही समस्या सोडविण्याच्या दिशेत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. ही बाब केवळ डेमू गाडीबाबतच नव्हे तर मेमू गाड्यांबाबतही हीच समस्या कायम आहे. इतवारी ते गोंदिया व दुर्ग ते गोंदिया येणाऱ्या गाड्यासुद्धा अशाचप्रकारे आऊटरवर थांबविल्या जातात. इतवारीवरून येणाऱ्या गाड्यांना तर गोंदियाजवळ दोन ठिकाणी थांबविले जाते. एक एमआयडीसीजवळ व त्यानंतर सूर्याटोलाजवळ. दोन्ही ठिकाणांवर एक तासापेक्षा अधिक वेळ प्रवाशांचा अकारणच जातो. दुर्गवरून येणाऱ्या गाड्यांना सिव्हील लाईनजवळ प्रोग्रेसिव्ह शाळेजवळ उभ्या केल्या जातात. रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केल्यावर सांगण्यात येते की, गोंदियात पर्याप्त प्लॅटफॉर्म नसल्यामुळे अशी स्थिती निर्मित होत आहे. जेव्हा या गाड्या पोहोचतात तेव्हा प्लॅटफॉर्म उपलब्ध राहत नाही. त्यामुळे सदर गाड्यांना आऊटरवर थांबविले जाते.या संदर्भात गोंदिया रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक रविनारायण कार यांनी सांगितले की, ही समस्या गोंदिया स्थानकाशीच निगडीत नाही, तर ज्या प्रकारची व्यवस्था बनविण्यात आली आहे, त्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. वरील आदेशाने सदर समस्या सोडविण्याचेही त्यांनी सांगितले. मात्र वरिष्ठ स्तरावरही सदर समस्या सोडविण्याच्या दिशेने काहीही प्रयत्न करण्यात आले नाहीत.(प्रतिनिधी)