गृहभेट आपुलकीअंतर्गत प्रशासन आपल्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:17+5:302021-05-03T04:23:17+5:30

नवेगावबांध : विशेष साहाय्य योजनेंतर्गत जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या संकल्पनेतील गृहभेट आपुलकीची या योजनेंतर्गत संजय गांधी निराधार ...

Home Visit Kindness Administration at your doorstep | गृहभेट आपुलकीअंतर्गत प्रशासन आपल्या दारी

गृहभेट आपुलकीअंतर्गत प्रशासन आपल्या दारी

Next

नवेगावबांध : विशेष साहाय्य योजनेंतर्गत जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या संकल्पनेतील गृहभेट आपुलकीची या योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध योजनांचे लाभार्थ्यांचे अर्ज या मोहिमेंतर्गत भरून घेण्यात येणार आहे. कोरोना संसर्गकाळात प्रशासन लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचून माहिती देत आहे.

या उपक्रमांतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन या योजनेचे पात्र लाभार्थी तालुक्यात बऱ्याच प्रमाणात आहे. परंतु, या योजनेविषयी माहिती नाही किंवा ते खूप गरीब आहेत. सध्या कोरोनाकाळात वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे लाभार्थी हे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा लाभार्थ्यांसाठी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलाठी कार्यालयांतर्गत तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये ३ ते ८ मे या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. नवेगावबांध येथे ३ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गृहभेट आपुलकीची हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात संजय गांधी निराधार योजनेतील विविध योजनांचे लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता गावातील लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे ग्रामपंचायतीचे सरपंच अनिरुद्ध शहारे व तलाठी पुंडलिक कुंभरे यांनी कळविले आहे.

.....

दवंडीच्या माध्यमातून माहिती

तालुक्यातील २९ ग्रामपंचायत कार्यालयांत ३ ते ८ मे पर्यंत गृहभेट आपुलकीची ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गावांतील लाभार्थ्यांना देण्यात यावी. यासाठी तलाठ्यांनी गावोगावी दवंडीद्वारे ही माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश अर्जुनी मोरगाव तहसीलदार विनोद मेश्राम यांनी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना दिले आहेत.

......

अधिकाऱ्यांचे तयार केले पथक

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तहसील कार्यालयातील तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार के.एन. वाढई, भानारकर, मुनेश्वर गेडाम, मनीषा देशमुख व अव्वल कारकून आशा तागडे, लुचे, रीता गजभिये यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक दिलेल्या निर्धारित तारखेला व वेळेला ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहणार आहे.

.....

४३९ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

यापूर्वी जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान ही मोहीम तालुक्यात राबविण्यात आली होती. यावेळी लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन ४४९ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध योजनांतील पात्र ४३० लाभार्थ्यांचे अर्ज तत्काळ मंजूर करण्यात येऊन त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.

Web Title: Home Visit Kindness Administration at your doorstep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.