स्वच्छतेसाठी सरसावले ‘हेल्पिंग बॉईज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 09:42 PM2018-02-05T21:42:31+5:302018-02-05T21:42:50+5:30

आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे हे उद्दीष्ट बाळगून शहरातील तरूणांचा ‘हेल्पींग बॉईज’ ग्रुप पुढे सरसावला आहे.

'Helping Boys' for Cleanliness | स्वच्छतेसाठी सरसावले ‘हेल्पिंग बॉईज’

स्वच्छतेसाठी सरसावले ‘हेल्पिंग बॉईज’

Next
ठळक मुद्देशहरात स्वच्छता अभियान : शासकीय मदतीशिवाय स्वच्छतेसाठी धडपड

आॅनलाईन लोकमत
देवरी : आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे हे उद्दीष्ट बाळगून शहरातील तरूणांचा ‘हेल्पींग बॉईज’ ग्रुप पुढे सरसावला आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान किंवा लोकप्रतिनिधींची मदत न घेता हे तरूण स्वखर्चातून शहरात विविध कामे करून व स्वच्छता अभियान राबवित आहेत. त्यांच्या या उपक्रमाने एक वेगळा आदर्श निर्माण केला असतानाच शहराचा चेहरा-मोहरा पालटण्यास सुरूवात झाली आहे.
‘हेल्पींग बॉईज’ गु्रपमध्ये कोणीही पदाधिकारी सर्वच समान सदस्य आहेत. शहराचा विकास करण्याची तळमळ मनात ठेवून त्यांनी कुणाकडेही हात न पसरविता आपसात वर्गणी गोळा करून विविध कामांना सुरूवात केली आहे.
यांतर्गत एसटी स्टॅँड परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता १० ट्रीप मुरुम खरेदी करुन आणले. एवढेच नव्हे तर गु्रपच्या सर्व सदस्यांनी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविले.
याशिवाय एसटी स्टॅँड परिसरात तसेच नगर पंचायत व तहसील कार्यालय परिसरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविले.
त्यांच्या कार्याचे कौतूक करुन त्यांचे मनोबल वाढविण्याकरिता नगराध्यक्ष सुमन बिसेन, उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, मुख्याधिकारी राजेन्द्र चिखलखुंदे, नगरसेविका माया निर्वाण, कौशल कुंभरे, नायब तहसीलदार व्ही.व्ही.जाधव, बिसेन आदिंनी या अभियानात सहभाग घेऊन गु्रपचे पवन शर्मा, शुभम चौधरी, वाजीद मेमन, सोनू शाहू, गोलू गुप्ता, कुणाल कत्रे, सैयब शेख, सोहेल खान, अर्बद खान, निकेश डोंगरे, नदीम पठान, राहूल गिºहेपुंजे, नितीन कोल्हारे, मयंक गुप्ता, मोहित सोनसर्वे, राहूल गुप्ता, देवा सोनसर्वे व बंटी श्रीवास्तव या तरूणांचे कौतूक केले.

Web Title: 'Helping Boys' for Cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.