शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईवर मात करण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 00:55 IST

तहसील कार्यालय तिरोडा व गोरेगाव तालुक्यांची जलयुक्त शिवार योजना आढावा बैठक घेण्यात आली.

विजय रहांगडाले : जलयुक्त शिवार योजनेचे माध्यम तिरोडा : तहसील कार्यालय तिरोडा व गोरेगाव तालुक्यांची जलयुक्त शिवार योजना आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये विधानसभा क्षेत्रातील २०१६-१७ वर्षातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला. यात जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होईल, असे मत आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले. यात गोरेगाव तालुक्यातील कृषी विभाग, ल.पा., जि.प., पं.स., ग्रा.पं., लघु सिंचन, वनविभाग अंतर्गत एकूण ४१३ कामे घेण्यात आली होती. त्यात १६९ कामे पूर्ण झाली असून १३० कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित ११४ कामे लगेच सुरु होणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सन २०१७-१८ अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील १० गावांचा समावेश करण्यात आला असून विविध यंत्रणेमार्फत ४८४ कामांकरिता आराखडा सादर करण्यात आला आहे. तसेच तिरोडा तालुक्यामध्ये सन २०१६-१७ मध्ये एकूण निवड झालेल्या ०९ गावांतील २३८ कामांपैकी १९५ कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर असून मे महिन्याअखेर पूर्ण होणार आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रामुख्याने कृषी विभाग १३८ कामे, लपाजिप विभाग ३७ कामे, वनविभाग २३ कामे, लपा विभाग राज्यस्तर ६ कामे व पंचायत समिती ४ कामे याप्रमाणे विविध यंत्रणेचा समावेश असून प्रामुख्याने सिनाबा, भाखादू, जुने तलावातील गाळ काढणे, बोडी खोलीकरण, समतल सलगचर खोदणे, खोदतळे, सिमेंट नाल्यातील गाळ काढणे आदी कामे घेण्यात आली. सन २०१७-१८ अंतर्गत तिरोडा तालुक्यातील १० गावांचा समावेश करण्यात आला असून विविध यंत्रणेमार्फत १२४ कामांकरिता आराखडा सादर करण्यात आला आहे. निवड झालेल्या गावांमध्ये मे महिन्यापासून कामे सुरु होणार आहेत. क्षेत्रात जलयुक्त शिवार योजनेमार्फत पाण्याची पातळी वाढली असली तरी नागरिकांनीसुध्दा याकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद देणे गरजेचे आहे. तसेच तापमानवाढीमुळे तालुक्यातील पाण्याचे साठे कमी होत असून पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ शकते. याकरिता सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश आमदारांनी दिले. तसेच पाणी टंचाईची भीषण समस्या उद्भवू नये याकरिता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व येणाऱ्या दिवसात पाणी साठवणीसाठी सहयोग करण्याचे जनतेस आ. रहांगडाले यांनी आवाहन केले. आढावा बैठकीत प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, तालुका कृषी अधिकारी मंगश वावधने, उपकार्यकारी अभियंता अनंत जगताप, कृषी अधिकारी पोटदुखे, वनपरिक्षेत्राधिकारी विजय कदम, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, उपकार्यकारी अभियंता भांडारकर, पशिने व सर्व संबंधित यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)