प्रसारमाध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:37+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने रोग प्रतिकार क्षमता वाढविणे देखील गरजेचे आहे. लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाचे प्रतिनिधी असलेले प्रसारमाध्यम प्रतिनिधी हे वृत्तसंकलन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात.

Health check of media representatives | प्रसारमाध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी

प्रसारमाध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी

ठळक मुद्देहोमिओपॅथिक कॉलेज व माहिती कार्यालयाचा पुढाकार : ५५ प्रतिनीधींनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्तवतीने बुधवारी (दि.१३) आरोग्य तपासणी शिबिरात जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांच्या ५५ प्रतिनिधींची आरोग्य तपासणी करण्यात आली. नवीन प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्र मांक २५ मध्ये असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयातील सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने रोग प्रतिकार क्षमता वाढविणे देखील गरजेचे आहे. लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाचे प्रतिनिधी असलेले प्रसारमाध्यम प्रतिनिधी हे वृत्तसंकलन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्यांचा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी त्यांची देखील रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. याचाच एक भाग म्हणून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिरात माध्यमांच्या प्रतिनिधींची थर्मल स्कॅनिंग, नाडीचे ठोके आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. या वेळी प्रतिबंधात्मक औषधे मोफत देण्यात आली.
या आरोग्य तपासणी शिबिरात गोंदिया होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉ.हर्षा कानतोडे, डॉ.रोशन कानतोडे, डॉ.सुषमा गौपाले, डॉ.ललित रहांगडाले, डॉ.सपना पटले, डॉ.राजेश हत्तीमारे, डॉ.गुरुप्रीत कौर, डॉ.आकांक्षा अग्रवाल, डॉ.साक्षी तिवारी, डॉ.निहाल कुंभलकर, डॉ.रीचा कोडवानी, डॉ. रुचिता जगवानी यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींची आरोग्य तपासणी केली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे कैलाश गजभिये, धम्मदिप बोरकर, पंढरीनाथ लुटे, अमित आखरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Health check of media representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.