पिपरिया परिसराची आरोग्य सेवा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:07+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत येणाऱ्या पिपरिया उपकेंद्रात परिसराची आयुर्वेदिक दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणे करुन या आदिवासी क्षेत्रातील लोकांना १०-१२ किलोमीटरचा प्रवास करुन सालेकसा येथे न जाता गावात वेळेवर औषधोपचार मिळू शकेल. परंतु येथील आयुर्वेदिक दवाखान्यात येणारे डॉक्टर दररोज येत नसून आठवड्यातून १-२ दिवसच उपस्थित राहतात.

The health care of the Pipariya area is on the air | पिपरिया परिसराची आरोग्य सेवा वाऱ्यावर

पिपरिया परिसराची आरोग्य सेवा वाऱ्यावर

ठळक मुद्देऔषधोपचारासाठी नागरिकांची भटकंती : साथ रोग काळात आरोग्य विभाग सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा: पावसाळ्यात विविध प्रकारचे साथरोग पसरण्याची शक्यता असते. अशावेळी आरोग्य विभाग सुस्त राहत असेल तर केव्हाही कोणत्याही आजाराचे संक्रमण वाढू शकतात. अशीच परिस्थिती सध्या पिपरिया परिसरात दिसून येत आहे. येथील आरोग्य सेवा वाºयावर असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत येणाऱ्या पिपरिया उपकेंद्रात परिसराची आयुर्वेदिक दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणे करुन या आदिवासी क्षेत्रातील लोकांना १०-१२ किलोमीटरचा प्रवास करुन सालेकसा येथे न जाता गावात वेळेवर औषधोपचार मिळू शकेल. परंतु येथील आयुर्वेदिक दवाखान्यात येणारे डॉक्टर दररोज येत नसून आठवड्यातून १-२ दिवसच उपस्थित राहतात. त्यामुळे परिसरातील गरीब आदिवासी जनतेला नियमित औषधोपचार लाभत नाही.
पिपरिया क्षेत्र आदिवासी नक्षलग्रस्त भागात असून जंगलाने व्यापलेला परिसर आहे.
त्यामुळे या भागात हिवताप, सर्पदंश, दूषित पाण्यापासून होणारे साथ रोग इत्यादी आजार नेहमी बळावण्याची शक्यता असते. अशात या भागात नियमित आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. परंतु दररोज डॉक्टर उपलब्ध राहत नसल्याने लोकांना आरोग्य सेवा मिळत नाही.

प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी
पिपरिया परिसर प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसामध्ये समाविष्ट असून पिपरिया ते दरेकसाचे अंतर सुमारे २५ किलोमीटर एवढे आहे. तालुका मुख्यालयापासून १२ ते १५ किलोमीटरचा प्रवास या क्षेत्रातील नागरिकांना करावा लागतो. अशात या भागात वेळेवर आरोग्य सेवा मिळणे एक मोठी समस्या आहे. पिपरिया येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दिल्यास नागरिकांच्या आरोग्याची समस्या दूर होऊ शकते. करिता पिपरिया प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: The health care of the Pipariya area is on the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.