मुख्याध्यापिकेचा शाळेतच कुऱ्हाडीने घाव घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 03:18 IST2019-07-03T03:18:28+5:302019-07-03T03:18:32+5:30

वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिकेचा कुऱ्हाडीने घाव घालून पतीने शाळेतच खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी तालुक्याच्या इर्री येथे घडली.

 The headmaster's school was hacked to death by the ax | मुख्याध्यापिकेचा शाळेतच कुऱ्हाडीने घाव घालून खून

मुख्याध्यापिकेचा शाळेतच कुऱ्हाडीने घाव घालून खून

गोंदिया : वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिकेचा कुऱ्हाडीने घाव घालून पतीने शाळेतच खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी तालुक्याच्या इर्री येथे घडली.
प्रतिभा दिलीप डोंगरे (५१) असे खून झालेल्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. घरगुती वादातून दिलीप याने खून केल्याची माहिती आहे. नेहमीप्रमाणे मुख्याध्यापिका डोंगरे ह्या शाळेत गेल्या, प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. यानंतर दिलीप डोंगरे शाळेत आला. त्याने विद्यार्थ्यांच्या समोरच प्रतिभा डोंगरे यांना ओढत शाळेच्या ग्राऊंडमध्ये आणले. यामुळे शाळेत गोंधळ उडाला. आजूबाजूचे लोक हा थरार पाहून गोळा झाले. त्याने प्रतिभाच्या डोळ्याात मिरची पावडर टाकून तिच्यावर सपासप कुºहाडीने वार केले. गळ्यावर, मानेवर, पाठीवर असे वार करून त्यांना क्षणाधार्थ यमसदनी पाठविले. लगेच लोकांच्या हातात लागू नये म्हणून घटना स्थळावरुन पळ काढला.

चारित्र्यावर संशय
प्रतिभावर तो चारित्र्याचा संशय घेऊन नेहमी तिच्याशी वाद घालायचा. तीन-चार महिन्यापूर्वी झालेल्या वादाचे हेच कारण असल्यामुळे तो त्यांना सोडून ईर्रीला आला होता. दिलीप आपला वारंवार छळ करीत असल्यामुळे प्रतिभाने त्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती, असे बोलले जात आहे.

Web Title:  The headmaster's school was hacked to death by the ax

टॅग्स :Murderखून