कुऱ्हाडीने घाव घालून केला तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST2021-11-22T05:00:00+5:302021-11-22T05:00:07+5:30

मुनेश्वरच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे तीन घाव असताना ४ दिवसांपूर्वी रानडुकरामुळे किरकोळ जखमी झालेल्या मुनेश्वरचा खाटेखाली पडल्यामुळे मृत्यू झाला असावा असे त्याच्या पत्नीचे म्हणणे होते. परंतु पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली असता कुऱ्हाड कुठे होती, कुणी आणून ठेवली याची सखोल माहिती घेतली.  कुऱ्हाडीने घाव घातल्यावर कुऱ्हाडीला लागलेले रक्त धुऊन टाकण्यात आले. परंतु बेडवर रक्ताचा सडा आढळला असून या खुनामागे गूढ रहस्य आहे.

He killed the young man with an ax | कुऱ्हाडीने घाव घालून केला तरुणाचा खून

कुऱ्हाडीने घाव घालून केला तरुणाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम बघोली येथील मुनेश्वर सहेसराम पारधी (३२) या तरुणाला कुऱ्हाडीने घाव घालून ठार केल्याची घटना रविवारी (दि. २१) पहाटे ४ वाजतादरम्यान उघडकीस आली. खून झाला त्यावेळी मुनेश्वर व त्याची पत्नी एकाच खोलीत असताना या खुनासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही, असे मुनेश्वरच्या पत्नीचे म्हणणे आहे. हा खून पहाटे १.३० च्या सुमारास झाला असावा असा कयास लावला जात आहे.  घटनेची माहिती मिळताच गोंदियावरून श्वान व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 
  मुनेश्वरच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे तीन घाव असताना ४ दिवसांपूर्वी रानडुकरामुळे किरकोळ जखमी झालेल्या मुनेश्वरचा खाटेखाली पडल्यामुळे मृत्यू झाला असावा असे त्याच्या पत्नीचे म्हणणे होते. परंतु पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली असता कुऱ्हाड कुठे होती, कुणी आणून ठेवली याची सखोल माहिती घेतली. 
कुऱ्हाडीने घाव घातल्यावर कुऱ्हाडीला लागलेले रक्त धुऊन टाकण्यात आले. परंतु बेडवर रक्ताचा सडा आढळला असून या खुनामागे गूढ रहस्य आहे. यापूर्वी दवनीवाडा पोलीस ठाण्यात केलेली विनयभंगाची तक्रार त्यातून वाढलेला तणाव हा तर खुनाला कारणीभूत नाही ना, या दिशेनेही दवनीवाडा पोलीस तपास करणार आहेत.
  या खुनासंदर्भात दवनीवाडाचे ठाणेदार भोसले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आता तपास सुरू आहे, काही सांगता येत नाही असे बोलून खुनासंदर्भात बोलण्यास टाळले. तसेच संपूर्ण माहिती पुढे आल्यावर माहिती देऊ, असे ते म्हणाले. मुनेश्वरचे वडील पक्षाघाताने ग्रस्त आहेत. 
मुनेश्वरला ५ वर्षाची मुलगी व २ वर्षाचा मुलगा आहे. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, तिरोड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव यांनी भेट दिली.­

एक ताब्यात
- काही दिवसांपूर्वी कुणाल मनोहर पटले (२१) रा. बघोली याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दवनीवाडा पोलिसात दाखल करण्यात आला होता. त्याने वचपा काढण्यासाठी हा खून केला असावा, असा कयास लावून दवनीवाडा पोलिसांनी कुणाल पटले याला ताब्यात घेतले आहे. पोलिस आता त्याची कसून चौकशी करणार आहेत.

 

Web Title: He killed the young man with an ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.