शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

आधी हिशेब, नंतर ग्रामसभा

By admin | Updated: January 29, 2016 04:40 IST

प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तालुक्यातील

सडक अर्जुनी : प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तालुक्यातील वडेगाव (सडक) येथील गावकऱ्यांनी आधी हिशेब द्या, नंतर ग्रामसभा घ्या, असा पवित्रा घेत ग्रामपंचायतच्या आलमारीला कुलूप लावून आपला रोष व्यक्त केला.गेल्या सात वर्षापासून वडेगाव येथे ग्रामसेवक सुभाष सिरसाम हे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळातील कामांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी २६ जानेवारीला सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच घनश्याम मेंढे यांची एकमताने निवड करण्यात आली. गावकऱ्यांचा रोष पाहता ग्रामसभेच्यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या ग्रामसभेची पूर्वसूचना पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी झामसिंग टेंभरे व पंचायत विभागाचे नेताजी धारगावे, शरद झामरे तसेच कृषी विभागाचे सुरेंद्र धमगाये यांना दिल्याने ते ग्रामसभेला उपस्थित होते. यावेळी खंडविकास अधिकारी टेंभरे यांनी गावाच्या विकासाच्या योजनांबद्दल माहिती सांगितली. कृषी विस्तार अधिकारी धामगाये यांनी विविध योजनांची माहिती ही गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे ग्रामसभेत रोष व्यक्त होत असल्याचे सांगितले.ग्रामस्वच्छता अभियानाच्या तीन लाखांच्या बक्षीसाचा हिशेब न दिल्यामुळे या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा दाट संशय गावकऱ्यांना आला. त्यामुळे आधी हिशेब द्या, नंतर ग्रामसभा घ्या, असा पवित्रा घेवून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष ग्रामपंचायतच्या आलमारीला कुलूप ठोकून गावकऱ्यांच्या व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या समक्ष निष्पक्ष चौकशी करण्याचे ग्रामसेवक सिरसाम व पंचायतचे विस्तार अधिकारी नेताजी धारगाये यांनी लेखी लिहून दिले. यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य राधिका हुकरे, शोभा खोब्रागडे, सुषमा ब्राम्हणकर, यशोधरा मुनीश्वर, भावराव मेंढे, उपसरपंच राजेंद्र खोटेले आदी व गावकरी बाबुराव हुकरे, घनशाम मेंढे, देवचंद खोब्रागडे, प्रदीप मुनीश्वर, तुळसीराम मुनीश्वर, अनंतरकुमार मुनीश्वर, अशोक सूर्यवंशी, राजेश सूर्यवंशी, केशोराव तरोणे, प्रभाकर भेंडारकर, दशरथ भोरजारे, चैतराम, खोटेले, जीवन मुनीश्वर, कंठी ब्राम्हणकर, योगराज हुकरे, राजेश मुनीश्वर, राजेंद्र हुकरे, सुनील मुनिश्वर, हरिंचंद्र मुनिश्वर, चोपराम मेंढे यांच्यासह शेकडो लोक उपस्थित होते. चौकशीअंती ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाही करण्याची मागणीही गावकऱ्यांनी एकमताने केली आहे. (शहर प्रतिनिधी)अन् आलमारीला ठोकले कुलूप४ग्रामपंचायतच्या सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच व सचिव आपल्या मनमर्जीने कामे करतात व शासनाचा आलेला निधी कुठे खर्च केला याची साधी माहितीही सदस्यांना देत नाही, तेराव्या वित्त आयोगाची व सामान्य फंडाचा लेखाजोखा वेळोवेळी न दिल्यामुळे या समस्यांना घेवून सदस्य व गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या आलमारीला ‘कुलूप ठोको’ कार्यक्रम केला.