धानावरील किड व उपायांवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:00:50+5:30

ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय (पिंपरी-वर्धा) येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी श्रुती खेमलाल मस्करे यांनी भात पिकावरील खोडकीडा नियंत्रणाकरिता फेरो मेनट्रॅप लागवडीचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच उमेदचे प्रभाग व्यवस्थापक रमेश लिल्हारे यांनी दशपर्णी व निंबोळी अर्ककसे तयार करावे व त्यांच्या उपयोगांची माहिती दिली.

Guidance on rice pests and remedies | धानावरील किड व उपायांवर मार्गदर्शन

धानावरील किड व उपायांवर मार्गदर्शन

ठळक मुद्देपींडकेपार येथील शेतीशाळा : तालुका कृषी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गंोंदिया : तालुक्यातील ग्राम पींडकेपार येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचावतीने शेतकऱ्यांची शेतीशाळा वर्ग-५ चे आयोजन करण्यात आले होते. यात धानावर लागणाऱ्या विविध कीड व रोगांची ओळख कशी करावी व त्यावर उपाय कोणते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी सरपंच सुधीर चंद्रिकापुरे होते.मार्गदर्शक म्हणून कृषी सहायक भावेश दमाहे यांनी करपा, कडा करपा,खोडकिडा, गादमाशी, तुडतुडे इत्यादी रोग व किडींची ओळख व त्यावर नियंत्रण करण्याची माहिती पद्धत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दिली.
ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय (पिंपरी-वर्धा) येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी श्रुती खेमलाल मस्करे यांनी भात पिकावरील खोडकीडा नियंत्रणाकरिता फेरो मेनट्रॅप लागवडीचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
तसेच उमेदचे प्रभाग व्यवस्थापक रमेश लिल्हारे यांनी दशपर्णी व निंबोळी अर्ककसे तयार करावे व त्यांच्या उपयोगांची माहिती दिली. संचालन करून आभार कृषी मित्र राधेलाल कोठेवार यांनी मानले. याप्रसंगी गावातील शेतकरी, ग्रामपंचायत कर्मचारी, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Guidance on rice pests and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.