शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाढीचा आलेख होतोय अप-डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

बुधवारी (दि.१२) जिल्ह्यातील ५७२ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ६२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. ५ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. बुधवारी आढळलेल्या ६२६ रुग्णांमध्ये सर्वाधिक २२० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ४१, गोरेगाव ३४, आमगाव ९०, सालेकसा ४४, देवरी ६६, सडक अर्जुनी २८, अर्जुनी मोरगाव १०१ आणि बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे५७२ बाधितांची मात : ६२६ नवीन रुग्णांची नोंद : ५ बाधितांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत कधी वाढ, तर कधी घट होत असल्याचे चित्र आहे. मात्र, रुग्णवाढीचा आलेख जरी अप-डाऊन होत असला बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची एकूण संख्या अधिक असल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. रुग्णवाढीचा आलेख वर-खाली होत असल्याने कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसून जिल्हावासीयांना अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे. बुधवारी (दि.१२) जिल्ह्यातील ५७२ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ६२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. ५ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. बुधवारी आढळलेल्या ६२६ रुग्णांमध्ये सर्वाधिक २२० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ४१, गोरेगाव ३४, आमगाव ९०, सालेकसा ४४, देवरी ६६, सडक अर्जुनी २८, अर्जुनी मोरगाव १०१ आणि बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १४०९८१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११७१७१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १४३७५३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२३३६८ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ३८६७२ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ३४००५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४०५१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ११७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.  

ग्रामीण भागात वाढतोय शिरकाव  कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा फारसा शिरकाव झाला नव्हता. ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा बरीच काळजी घेतली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत दुर्लक्ष केले. ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शहरी भागासह ग्रामीणमध्येसुद्धा सक्रिय रुग्णांची संख्या २ हजारांवर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मृत्यूचे सत्र सुरूच कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. त्यामुळेच कोरोनाने मृृत्यू झालेल्यांचा आकडा ६२६ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३६५ बाधितांचे मृत्यू यंदा एप्रिल महिन्यात झाले आहेत. दररोज ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या